Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांकडून फसवणूक सुरूच; दोघांना 25 लाखांना घातला गंडा

Latest Cyber Crime News : ७१ वर्षीय तक्रारदारास सायबर भामट्यांनी १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान, व्हॉटसॲपवर कॉल आले आणि चॅटिंगच्या माध्यमातून संपर्क साधत, मी प्रदीप सामंत, अंधेरी पोलिस ठाण्यातून बोलत असून नरेश गोयल नावाच्या मोबाईलवरून मनी लाँन्ड्रिंगचे व्यवहार झाले असून ते संशयास्पद आहेत.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Nashik Cyber Crime : सायबर फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत असून, त्यासंदर्भात सायबर पोलिसांकडून जनजागृतीही केली जात आहे. असे असले तरी सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकून वयोवृद्धास २० लाखांना गंडा घातला तर दुसऱ्या घटनेत दोघा संशयितांनी एकाला ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून ५ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. (Cheating by cyber crooks continues Both fined 25 lakhs)

७१ वर्षीय तक्रारदारास सायबर भामट्यांनी १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान, व्हॉटसॲपवर कॉल आले आणि चॅटिंगच्या माध्यमातून संपर्क साधत, मी प्रदीप सामंत, अंधेरी पोलिस ठाण्यातून बोलत असून नरेश गोयल नावाच्या मोबाईलवरून मनी लाँन्ड्रिंगचे व्यवहार झाले असून ते संशयास्पद आहेत. त्यामुळे तुमचा आतापर्यंतचा आर्थिक तपशील, स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती पोलिसांसमक्ष सादर करावी लागणार असल्याचे सांगितले.

तसेच, आमच्या ईडी कार्यालयातील मॅडमसोबत बोलून घ्या,' असे सांगत काही वेळाने आकांक्षा अग्रवाल नामक तोतया महिला अधिकाऱ्याने तक्रारदार वृद्धाशी बोलताना, ‘तुमचे मनी लाँन्ड्रिंगचे व्यवहार समोर आले असून तुम्हाला अटक केली जाईल, त्यामुळे या प्रकरणातून सहिसलामत सुटका करुन घ्यायची असेल तर, दिलेल्या बँक खात्यांमध्ये २० लाख ११ हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. मात्र, पैसे वर्ग केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. (latest marathi news)

Cyber Crime
Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांकडून दोघांची साडेपंचवीस लाखांची फसवणूक

किरण गुलाब निकुंभ (रा. बालाजीनगर, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मयूर कैलास राठोड, दिनेश गिरीधर वाघमारे (दोघे रा. तांबे कॉम्प्लेक्स, सावरकरनगर) यांनी ‘बिनामो’ या ट्रेडिंगचे आमिष दाखवून जादा आर्थिक परताव्याती हमी दिली.

१५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत संगनमत करून दोघांनी निकुंभ यांचा विश्वास संपादन करीत ५ लाख ३ हजार रुपये वेळोवेळी दिले. त्यानंतर संशयितांनी या रकमेचा अपहार करत पैशांचा परतावा न देता याच रकमेचा अपहार करुन फसवणूक केली.

Cyber Crime
Cyber Crime : सायबर भामट्याने बनावट ई-मेल पाठवुन बिडकीन येथील एका कंपनीला १८,७८,१११/- रुपयाला फसवले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.