Nashik Crime News : अवैध धंद्यांविरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई; आचारसंहितेच्या महिनाभरात 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हददीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतर्क असलेल्या शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे.
crime
crimeesakal
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हददीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतर्क असलेल्या शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. आचारसंहिता काळात पोलिसांनी अवैध दारुअड्डे, प्रतिबंधित गुटखा आणि अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवून तब्बल ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ()

बेकायदेशीर हत्यार बाळगणार्यांविरोधातही गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करताना टवाळखोरांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांना नोटीसा बजाविण्यात येत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मटके-जुगार अड्डे, देशीदारु अड्डयावर गुन्हे दाखल करणे, टवाळखोर व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, अवैध हत्यारे बाळगणार्यांविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय व शहर गुन्हेशाखेच्या पथकांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. निवडणूक काळात अवैध प्रकार वाढून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असते. मात्र, पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांना चांगलाच दणका बसला आहे.

भद्रकाली पोलिसांनी दूध बाजार परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. संशयित राजेश सातपुते, अन्सार शेख, भाऊसाहेब गाडे, अकील शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंबड पोलिसांनी दोंदे मळ्यात कारवाई करीत, संशयित श्याम ननावरे, नारायण कांबळे, रोहित सिंग, सागर गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पंचवटी पोलिसांनी अकराशे रुपयांची अवैध दारु संशयित अजय उघडे यांच्याकडून जप्त केली. भद्रकाली पोलिसांनी संशयित शंकर पांढरेकडून आठशे रुपयांची अवैध दारु जप्त केली.

crime
Nashik Crime News : व्याजासह पैसे भरूनही घर बळकावले! तिघा खासगी सावकारांना पोलिसांकडून अटक

आचारसंहिता काळातील कारवाई

- अवैध दारुसाठा व विक्री : ८६ गुन्हे

- ५ लाख ६२ हजार ११५ रुपयांची अवैध देशीदारू जप्त

- अवैध शस्त्रांच्या ४५ कारवाई : ८ गावठी पिस्तुल, ५३ विविध धारदार हत्यारे

- अंमली पदार्थांविरोधात ५ धाडसत्र : २ गांजा, ३ एमडीची कारवाई

- प्रतिबंधात्मक गुटखाविरोधात ६ कारवाई : ३२ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

- ३१३ संशयित टवाळखोरांना समन्स

- कलम १०७, ११० अंतर्गत ७५१ संशयितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई

''लोकसभा निवडणूक काळात अवैध मद्यसाठा वा विक्रीचे प्रकार वाढतात. त्याविरोधात पोलिस यंत्रणा सतर्क असून, अवैध व्यवसायाविरोधात धडक कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. पोलिस ठाणेनिहाय मोहीम राबवून कारवाईचे आदेश दिलेले आहेत.''- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा.

crime
Nashik Crime News : व्यापाऱ्याची लुटमार करणारे गजाआड! 48 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.