Nashik Fraud Crime : कॉम्प्युटर ॲक्सेसरीज विक्रेत्याने घातला 48 लाखांना गंडा; 18 दुकानदारांची केली फसवणूक

Fraud Crime : कॉम्प्युटरची ॲक्सेसरीज विक्रेत्याने शहरातील १८ दुकानदारांना तब्बल ४८ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : कॉम्प्युटरची ॲक्सेसरीज विक्रेत्याने शहरातील १८ दुकानदारांना तब्बल ४८ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयिताने दुकानदारांकडून ॲक्सेसरीज खरेदी केली आणि त्यांना पोस्ट डेटेड धनादेश दिले. मात्र दुकानदारांनी ते धनादेश वटण्यास टाकले असता ते बाऊन्स झाल्यानंतर त्यांनी संशयितांशी संपर्क साधला. मात्र तो पसार झाला असून, त्याने दुकानदारांना दिलेला पत्ता व कागदपत्रेच बनावट असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, शहर आर्थिक गुन्हेशाखा तपास करीत आहे. (Computer accessories dealers fraud 48 lakhs )

मंदार पाटील असे संशयिताचे नाव आहे. जयेश पेंढारकर (रा. सप्तशृंगी अपार्टमेंट, तिडके नगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पाटील याने ओळख वाढवून १७ डिसेंबर २०२३ ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याच्या कॉम्प्युटर विक्री दुकानातून हार्डडिस्क, एलईडी, ईनव्हर्टर, यूएसबी केबल, माऊस, कि बोर्ड असे साहित्य खरेदी केले होते. प्रारंभी दुकानदारांचा विश्वास बसावा, यासाठी रोख स्वरुपात व्यवहार केल्याने पेंढारकर यांचा विश्वास बसला होता.

त्यामुळे त्यांनी तब्बल १७ लाख ५४ हजारांचा माल, अॅक्सेसिरिज मंदारला क्रेडिटवर दिली. याचवेळी मंदारने त्यांना माल खरेदीचे ‘पोस्ट डेटेड’ धनादेश दिले. त्यांनी ते बँकेत टाकले असता न वटल्याने परत आले. त्यामुळे पेंढारकर यांनी ओळखीतील दुकानदारांना संपर्क केला असता, संशयिताने १७ दुकानदारांकडूनही सुमारे ३१ लाखांचे साहित्य खरेदी केले.

Fraud Crime
Nashik Fraud Crime : मालेगावमध्ये अंधशाळा दाखवून शासनाचे लाटले अनुदान

परंतु पैसे न दिल्याचे समजले. पेंढारकर यांनी संशयित मंदारला संपर्क साधला असता, त्याने त्याने व्यवसायात तोटा झाल्याचे व पार्टनरचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगून वेळ मागून घेतली. परंतु, नंतर त्याच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकानदारांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा झाला आहे.

बनावट पत्ता

संशयित मंदार पाटील हा खासगी एक्झक्युटीव्ह असून तो कॅनडा कॉर्नरवरील आयमॅक्स टेक्नॉलॉजी या कॉम्प्युटर सेंटरमार्फत मालाची पुरवठा करीत होता. दोन ते तीन वर्षांपासून शहरातील विविध कॉम्प्युटर, लॅपटॉप विक्रेते व दुकानदारांच्या संपर्कात तो होता. आजच्या घडीला त्याच्या कॅनडा कॉर्नरवरील दुकानास टाळे आहे तर, दुकानदारांनी त्याचे घर शोधले असता, त्याठिकाणी तो कधीही राहण्यास नसल्याचेही समोर आले. त्याच्या आधारकार्डवरील पत्त्यावरही तो सापडला नाही. यावरून सदरील कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले आहे.

Fraud Crime
Nashik Fraud Crime : फ्लॅट ग्राहकांना सव्वा तीन कोटींचा चूना! बिल्डर पसार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.