Nashik Police Attack: राज्यातील कायदा सुव्यवस्थेतीच स्थिती गंभीर! आता भररस्त्यात ASI वर चाकू हल्ला

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ही दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे.
Nashik Police Attack: राज्यातील कायदा सुव्यवस्थेतीच स्थिती गंभीर! आता भररस्त्यात ASI वर चाकू हल्ला
Updated on

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ही दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या गंभीर घटनांनी महाराष्ट्राला हादरे बसत आले आहेत. त्यात आता नाशिकमधील घटनेनं हद्दच झाली आहे. कारण इथं एका ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यावरच एका सराईत गुन्हेगारानं भरदिवसा चाकूहल्ला करत पळ घडला.

Nashik Police Attack: राज्यातील कायदा सुव्यवस्थेतीच स्थिती गंभीर! आता भररस्त्यात ASI वर चाकू हल्ला
Chandrakant Handore Son Arrested : काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अटक! शुगर वाढल्याने रुग्णालयात केलं दाखल

नेमंक काय घडलंय?

नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थात ASI नामदेव सोनवणे या ज्य़ेष्ठ पोलीस कर्मचाऱ्यावर एका टोळक्यानं भर रस्त्यात चाकूनं हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळक्याला सोनावणे यांनी हटकल्यानं या टोळक्यातील एकानं भर रस्त्यात त्यांच्यावर चाकूनं वार केला. या हल्ल्यात सोनवणे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Nashik Police Attack: राज्यातील कायदा सुव्यवस्थेतीच स्थिती गंभीर! आता भररस्त्यात ASI वर चाकू हल्ला
Pune Crime : इनशर्ट नाही म्हणून... पुण्यात शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलं; मुलाच्या कान अन् नाकातून आलं रक्त

हल्ला झाला तरी पकडलं

पण विशेष म्हणजे आपल्यावर हल्ला झालेला असतानाही ASI सोनावणे यांनी या हल्लेखोरांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पंचवटी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.