Nashik Crime: वसतीगृहाचे साहित्य अन्‌ जेवणाची खोटी बिल दाखवून 19 लाखांचा अपहार! सातपूर ITIच्या प्राचार्याचा प्रताप

Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या फिर्यादीनुसार, संशयित प्रभारी प्राचार्य कदम हे २०१७ ते २०१८ या कालावधीत सातपूर आयटीआय येथे कार्यरत होते.
Satpur ITI Corruption
Satpur ITI Corruptionesakal
Updated on

Nashik Crime : सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालिन प्रभारी प्राचार्याने वसतिगृहासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करुन ते खरेदी न करता, फक्त बनावट बिले सादर करुन १९ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राचार्यासह दोन वेंडरविरोधात अपहारप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. (corruption of 19 lakhs by showing false bill of hostel material food satpur ITI)

सुभाष मारुती कदम असे तत्कालिन प्रभारी प्राचार्याचे नाव असून रोशन बधान व गोकूर पुरकर अशी तिघा संशयितांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या फिर्यादीनुसार, संशयित प्रभारी प्राचार्य कदम हे २०१७ ते २०१८ या कालावधीत सातपूर आयटीआय येथे कार्यरत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी सातपूर आयटीआयमार्फत वसतिगृहांतील साहित्याच्या खरेदीतील घोटाळ्यासंदर्भात तक्रार अर्ज आला होता.

याची गांभीर्याने दखल घेत ‘लाचलुचप’च्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांनी उपअधीक्षक अनिल बडगुजर, वैशाली पाटील, नरेंद्र पवार यांना तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पथकाला, सुभाष कदम आणि केंद्र शासनाच्या जेम (जेईएम) पोर्टलवर नोंदणी केलेल्या साहित्याचे गेट-वे सिस्टीमचे संचालक आणि पुरवठादार रोशन बधान, गोकुळ पूरकर यांच्यातील आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळून आला.

बनावट बिलांचे पुरावे मिळाल्यावर उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी सातपूर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांविरोधात आर्थिक अनियमितता, शासनाच्या रकमेचा अपहार, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा सातपूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

Satpur ITI Corruption
Nashik Fraud Crime : हातचलाखीने एटीएमची अदलाबदल करून फसवणूक!

वसतिगृहासाठी बनावट खरेदी

सुभाष कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत आयटीआयच्या वसतिगृहासाठी खुर्चा, लाकडी व लोखंडी पलंग, चादर, उशी व अन्य साहित्य संशयित बधान व पूरकर यांच्या मदतीने केंद्राच्या जेम पोर्टलवर खरेदी प्रक्रिया केली. प्रत्यक्षात बधान, पुरकर यांनी सदरील साहित्याचा पुरवठा न करता, कदम यांच्याशी संगनमत करून शासनाच्या १९ लाख ३३ हजार ७७२ रुपयांचा अपहार केल्याचे ‘लाचलुचपत’च्या तपासातून निष्पन्न झाले आहे.

जेवणाचीही खोटी बिले

संशयित प्राचार्य कदम यांनी २०१७ मधील आयटीआय महाविद्यालयातील तंत्रप्रदर्शन व क्रीडा स्पर्धेसाठी प्रशांत कडू बडगुजर यांच्यामार्फत जेवणाचे १९ हजार रुपयांचे खोटे बिले संबंधित यंत्रणेसह शासनाला सादर केले. तसेच, साई टी स्टॉलचे सतिश वाघमारे यांना ८ हजारांचे रोख देत उर्वरित ११ हजार रुपये आणि श्रीनिवास फ्लॉवरकडील कोरे बिले घेऊन ५ हजार ९१० रुपये असा एकूण १९ लाख ५० हजार ६९२ रुपयांचा अपहार केला आहे.

Satpur ITI Corruption
Wardha Crime : मुलाने केला वडिलांचा खून;वर्धा नदीच्या पात्रालगत मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.