Nashik Crime: स्क्रॅप मटेरियलच्या खोट्या वजन पावत्यातून करोडोंचा गंडा! अंबड परिसरातील वे-ब्रीज मालक चालकाविरोधात गुन्हा दाखल

Crime News : गेल्या २० वर्षांपासून या तीन कंपन्यांचे स्क्रॅप मटेरिअलचे वजन संशयित अभिषेक शर्मा यांच्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील महाराष्ट्र वे ब्रीज, जानकी वे ब्रीज आणि इंडस्ट्रीयल वे ब्रीज या तीन ठिकाणी वजन केले जाते.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik Crime : अंबड औद्यागिक वसाहतीतील कंपन्यांचे स्क्रॅप मटेरिअलचे संशयिताच्या तीन वे ब्रीजवर खोट्या वजन पावत्या करून गेल्या २० वर्षात तब्बल करोडो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Crores from false weight receipt of scrap material)

Fraud Crime
Nashik Fraud Crime: गुन्हा दाखल करण्याच्या आदेशास शिक्षणाधिकाऱ्यांकडून घुमजाव! टोकडेतील कौर विद्यालयातील फसवणूक प्रकरण

अभिषेक शर्मा असे संशयिताचे नाव आहे. प्रशांत अरुण संगई (रा. मते नर्सरीरोड, सावरकरनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या अंबड एमआयडीसीमध्ये तीन कंपन्या आहेत. यात इलोक्ट्रो फॅब इनोव्हेशन इंडिया प्रा.लि. आणि उरजयंत इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या २० वर्षांपासून या तीन कंपन्यांचे स्क्रॅप मटेरिअलचे वजन संशयित अभिषेक शर्मा यांच्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील महाराष्ट्र वे ब्रीज, जानकी वे ब्रीज आणि इंडस्ट्रीयल वे ब्रीज या तीन ठिकाणी वजन केले जाते.

परंतु या वे ब्रीजचे मालक व चालक यांनी गेल्या २० वर्षांपासून वजनाच्या खोट्या पावत्या तयार करीत फिर्यादी संगई यांना करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पवार हे तपास करीत आहेत.

Fraud Crime
Dhule Fraud Crime : ट्रेडिंग चालकाची फसवणूक! येवल्याच्या तिघांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.