Nashik Crime News : श्री प्रभु रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीत दररोज हजारो भाविक येतात. पंचवटीतील देवदर्शन व गंगाघाटावर स्नानासाठी भाविकांची गर्दी असल्याने याचा गैरफायदा चोरट्यांनी घेत तब्बल २ लाख ५५ हजार ५०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.
तर, कपालेश्वर मंदिराच्या पायथ्याशीच पंचवटीची पोलीस चौकी असतानाही चोरटे भाविकांचा ऐवज चोरून नेत आहेत. गंगाघाटावर चोऱ्या करणाऱ्या या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्रस्त भाविकांनी केली आहे. (Nashik Crime devotees come for Devdarshan robbed news)
पंचवटीतील सीतागुंफा येथे दर्शनासाठी आलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाखांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. सुजाता लक्ष्मी (७०, रा. कोरटा गेरे, जि. तुमकूर, कर्नाटक) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. २८) दुपारी साडेअकरा - बाराच्या सुमारास त्या दर्शनासाठी सीतागुंफा येथे गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाखांची सोन्याची पोत चोरून लंपास केली.
तर, गंगाघाटावरील रामतीर्थावर आलेल्या परजिल्ह्यातून आलेल्या शितल मुकेश वाघचौरे (रा. स्वामी विवेकानंद नगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.२८) सायंकाळी सहाच्या सुमारास त्या गंगाघाटावरील रामतीर्थ कुंडावर आल्या होत्या. त्यावेळी गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याची पोत, मोबाईल, रोख रक्कम, बसचे मोफत कार्ड असा २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. (Latest Marathi News)
तसेच, गंगाघाटावरील सांडवादेवी मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या कांचन मनोज कदम (रा. पार्क साईड रेसीडेन्सी, मेट्रो झोन, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. २७) रात्री नऊच्या सुमारास त्या सांडवा देवी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी गर्दीच्या फायदा घेत अज्ञात संशयिताने दागिने व रोकड असा १ लाख ३३ हजारांचा ऐवज लंपास केला. यात सोन्याचे दागिने, मोबाईल, रोकड व कागदपत्रे होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाकेच्या अंतरावर चौकी
गंगाघाटावरील श्री कपालेश्वर मंदिराच्या पायथ्याशीच पंचवटी पोलिस ठाण्याची चौकी आहे. याठिकाणी नियमित पोलीसांची नियुक्ती केलेली असते. परंतु बहुतांशी वेळा ही चौकी बंदच असते. तर या चौकीच्या हाकेच्या अंतरावर रामतीर्थ कुंड आहे. तरीही या परिसरात चोरट्यांच्या टोळ्या कार्यरत असून भाविकांच्या ऐवजावर डल्ला मारला जातो. असे असतानाही पोलिसांकडून गंगाघाटावरील चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.