Nashik Crime News : येथील कालिका देवी मंदिरामागे असलेल्या सहवासनगरमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने एकाशी वाद घातला. त्यावेळी वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावरच संशयित टोळक्याने हल्ला चढविला आणि धारदार हत्याराने वार करीत, त्याची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ९ संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. (Nashik Crime dispute death Sahwas Nagar marathi news)
पीयूष भिमाशंकर जाधव (२०, रा. सहवासनगर, कालिका मंदिरामागे, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, साहिल कृष्णा वांगडे (२८), नितीन शंकर दळवी (१८), निलेश रवी नायर (२६), ऋषिकेश संतोष जोर्वेकर (२०), प्रविण पुंडलिक निंबारे (१९), रोशन भगवान माने (२२), अजय संतोष शिंदे ( १९), देव संगीता वाघमारे (१९), आदित्य राजू महाले (२०, सर्व रा. सहवासनगर, कालिका मंदिरामागे, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पियुष जाधव याच्या मित्राचे आणि संशयित टोळक्यामध्ये वाद झाला होता. शुक्रवारी (ता. १९) रात्री अकरा-साडेअकरा वाजेच्या सुमारास मयत पियुष व त्याचे दोन मित्र सहवासनगर येथे गप्पा मारत होते. त्यावेळी मद्याच्या नशेमध्ये संशयित टोळके त्यांच्याजवळ आले असता, संशयितांनी जुन्या वादाची कुरापत काढून पियुषच्या मित्राशी वाद घालत त्यास शिवीगाळी सुरू केली.
त्यावेळी पियुष हा त्यांच्यात वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करीत होता. मात्र संशयित अधिक आक्रमक होत पियुषच्या मित्राला मारण्याचा प्रयत्न करीत होते. त्यातून वाद वाढत जाऊन संशयित टोळक्यातील एकाने त्याच्याकडील धारदार हत्याराने पियुष याच्यावरच वार करीत, त्याची निर्घृण हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच संशयित टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. पियुष यास हत्याराचा वर्मी घाव बसल्याने जो जागीच गतप्राण झाला. (latest marathi news)
घटनेची माहिती मिळताच मुंबई नाक्याचे वरिषठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक दत्ता गोडे, हवालदार देवीदास गाढवे, अंमलदार आकाश सोनवणे, किरण सवंत्सरकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ तासांत संशयित जेरबंद
पियुष जाधव याचा खून झाल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि साहिल कृष्णा वांगडे (२८), नितीन शंकर दळवी (१८), निलेश रवी नायर (२६), ऋषिकेश संतोष जोर्वेकर (२०) या चौघांना परिसरातून पसार होण्यापूर्वीच अटक केली. तर उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हेशाखेचे विशेष पथके रवाना झाली.
संशयित मखमलाबाद परिसरातील भोर मळ्यात दडून असल्याची खबर मिळताच पथकाने या परिसरात शोध मोहीम राबवून शनिवारी (ता.२०) पहाटे पाच संशयितांना अटक करण्यात आली. विशेष पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, रंजन बेंडाळे, भामरे, योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे , चंद्रकांत बागडे आदींनी कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.