Nashik Crime News : दारूच्या नशेत मित्राचा खून! देवळा पोलिस ठाण्यासमोर तणाव

Nashik News : दारूच्या नशेत दोन मित्रांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाल्याने एकाकडून दुसऱ्याचा खून झाल्याची घटना मटाणे (ता. देवळा) येथे बुधवारी (ता. ३१) घडली.
Deepak Sable
Deepak Sableesakal
Updated on

देवळा : दारूच्या नशेत दोन मित्रांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाल्याने एकाकडून दुसऱ्याचा खून झाल्याची घटना मटाणे (ता. देवळा) येथे बुधवारी (ता. ३१) घडली. यामुळे देवळा पोलिस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. दीपक निंबा साबळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत देवळा पोलिसांत मृत दीपक साबळे यांच्या भगिनी अंजना निक्षे यांनी फिर्याद दिली. (Drunk friend murder)

त्यात म्हटले आहे, की माझा भाऊ दीपक निंबा साबळे (वय ४५) व आरोपीसह त्याचे साथीदार यांनी देवळा येथील देशी दारू दुकानात सकाळी अकराच्या सुमारास सोबतच मद्यपान केले. त्या वेळी तेथील रंगकाम करणारे संतोष पवार ऊर्फ जाल्या (३८) याच्याशी उसनवार पैसे देण्यावरून वाद झाले. त्यानंतर ते मटाणे येथे गेले व दुपारी चारच्या दरम्यान मटाणे येथील चिकन दुकानाजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

वाद इतका विकोपाला गेला, की संतोष पवार याने दीपक साबळे याच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी संतोष पवार याला तत्काळ ताब्यात घेतले. (latest marathi news)

Deepak Sable
Nashik Crime News : मुलाच्या मदतीने पत्नीने केला नवऱ्याचा खून; दारूच्या व्यसनाला कंटाळून केले कृत्य

येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यात आला. घटनेची माहिती सर्वत्र पसरताच मृताच्या नातेवाइकांनी देवळा पोलिस ठाण्यासमोर गर्दी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी व यामागचे सूत्रधार व साथीदार यांच्यावरही कारवाई व्हावी, यासाठी देवळा पाच कंदीलजवळ काही काळ रास्ता रोको केले. पोलिसांनी त्यांची समजूत काढून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला.

Deepak Sable
Nashik Crime : वडाळागावात भोंदूबाबाने केला विवाहितेवर बलात्कार; भुतबाधा उपचाराच्या नावाखाली निघृण कृत्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.