मनमाड : मद्यधुंद अवस्थेत सरकारी वाहन चालवत घरी जात असताना येथील रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक संदीपकुमार सुदेशसिंग देसवाल यांनी आययुडीपी भागात रस्त्यावर असलेल्या दुचाकीला मागून धडक दिल्याने चालक आणि सातवर्षीय मुलगी खाली पडली.
याप्रकरणी जाब विचारला असता सदर व्यक्तीने शिवीगाळ करत दमदाटी दिल्याप्रकरणी अमोल दंडगव्हाळ यांच्या फिर्यादीवरुन अधिकाऱ्याविरोधात ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (drunk railway police officer vehicle collides with bike Manmad)
येथील आययुडीपी भागात राहणारे अमोल दंडगव्हाळ हे त्यांच्या घरासमोर दुचाकीवर (क्र. एमएच-४१-एस-३२४५) सात वर्षाच्या मुलीसोबत बसलेले होते. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक संदीपकुमार सुदेशसिंग देसवाल यांच्या सरकारी वाहनाने (क्र.एमएच-४१-एएस-७८६१) पाठीमागून दुचाकीला धडक दिली.
या घटनेत दुचाकीस दोघेही जमिनीवर कोसळले. देसवाल मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी दंडगव्हाळ यांना शिवीगाळ केली. स्थानिक नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ऐकून घेतले नाही. याप्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात देसवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.