Nashik Crime : संशयित युवतीच्या ब्लॅकमेलिंगमुळे युवकानं उचललं टोकाचं पाऊल! लिहिलेली सुसाईट नोट पोलिसांच्या हाती

Latest Crime News : मयत युवकाने सुसाईड नोटमध्ये संशयित युवतीच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले असून, चिठ्ठीत संशयितांची नावे आहेत.
lalit Kuyate
lalit Kuyateesakal
Updated on

Nashik Crime : खुटवड नगर परिसरातील कार्तिकेय नगरमध्ये राहणार्या २३ वर्षीय युवकाने आत्महत्त्या केल्याप्रकरणी दोन युवतीसह एका युवकाविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मयत युवकाने सुसाईड नोटमध्ये संशयित युवतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले असून, चिठ्ठीत संशयितांची नावे आहेत. (blackmailing by suspect young man took extreme step)

ललित बाळासाहेब कुयटे (२३, रा. कार्तिक रो हाऊस, कार्तिकेय नगर, खुटवडनगर) याने सोमवारी (ता.१) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली होती. तर, जिज्ञासा पाटील नवरे, ओंकार शिंदे, व मोना अशी संशयितांची नावे आहेत.

मयत ललित याचा भाऊ रोशन कुयटे याच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसात तिघा संशयितांविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत ललित याने गळफास घेण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. (latest marathi news)

lalit Kuyate
Nashik Crime : मंत्री भुजबळ यांना धमकी; संशयिताला आष्टीतून अटक! शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

या ललित याच्याकडे संशयित जिज्ञासा हिचे ९० हजार रुपये होते. त्यापैकी ४० हजार त्याने तिला दिले होते. परंतु त्यानंतरही संशयित व तिचा मित्र हे ललित यास त्रास देत होते. ललितच्या कुटुंबियांसह त्याच्या मित्रपरिवारात त्याची बदनामी केल्याने तो त्रस्त झाला होता. यातूनच तो मद्याच्या आहारी जाऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली, असे चिठ्ठीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक पाडवी हे करीत आहेत. 

lalit Kuyate
Nashik Sweeper Murder Case: सराईत गुंड व्यंक्या मोरेच्या सांगण्यावरून आकाशचा खून! तिघा संशयितांना पाच दिवसांची कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.