Nashik Crime: ‘स्टॉप ॲण्ड सर्च’ नाकाबंदीमुळे दोघे अट्टल चैनस्नॅचर्स जेरबंद! गेल्या 20 दिवसांतील 9 जबरी चोऱ्यांची उकल

Crime News : यावेळी संशयितांनी नाकाबंदी तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाठलाग करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Chain thief arrested in Indiranagar area. A team of Indiranagar Police Station along with it.
Chain thief arrested in Indiranagar area. A team of Indiranagar Police Station along with it.esakal
Updated on

Nashik Crime : राणेनगर परिसरातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून रथचक्र सोसायटीच्या दिशेने दुचाकीवरून भन्नाट निघालेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांना ‘स्टॉप ॲण्ड सर्च’ मोहिमेंतर्गत नाकाबंदीमुळे पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले.

यावेळी संशयितांनी नाकाबंदी तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाठलाग करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात एक संशयित अल्पवयीन तर दुसरा सराईत गुन्हेगार आहे. संशयितांच्या चौकशीतून त्यांनी गेल्या २० दिवसात ९ चैनस्नॅचिंग गुन्हयांची उकल झाली आहे. (Nashik Crime 9 forced burglaries solved in last 20 days marathi news)

परवेज मनियार (२५, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्याचा साथीदार हा अल्पवयीन आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीमध्ये ‘स्टॉप ॲण्ड सर्च’ ही मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली जाते.

यानुसार इंदिरानगर हद्दीतही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या नेतृत्वाखाली स्टॉप अॅण्ड सर्च मोहीम सुरू होती. याचवेळी संशयित चोरट्यांनी बुधवारी (ता. ३१) रात्री आठच्या सुमारास राणेनगर परिसरातील ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून रथचक्र सोसायटीच्या दिशेने वेगात दुचाकीने पोबारा केला.

यावेळी जागरुक नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्टॉप ॲण्ड सर्च मोहिमेवरील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असता, संशयित हे रथचक्र चौकात आले. त्यावेळी नाकाबंदी पाहून संशयितांनी पोबार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी दोघांचा पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

चौकशीतून संशयितांनी इंदिरानगर आणि अंबड हद्दीतील सोनसाखळी ओरबाडून नेल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दोन सोन्याच्या पोती व दुचाकी जप्त केली आहे. सदरची कामगिरी सहायक निरीक्षक अंकोलीकर, सागर कोळी, राठोड यांनी बजावली. (latest marathi news)

Chain thief arrested in Indiranagar area. A team of Indiranagar Police Station along with it.
Dhule Crime News : वार येथील खूनप्रकरणी एकाला जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा निकाल

आयुक्तांची धाव

गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या चैनस्नॅचिंगच्या घटनांनी पोलीस टिकेचे धनी झाले होते. दोघा चैनस्नॅचर्सला पकडल्याचे आणि चौकशीत ९ गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती कळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी इंदिरानगर पोलिस ठाणे गाठले.

संशयितांची टोळी

संशयित मनियार हा तडीपार सराईत गुन्हेगार आहे. तो टवाळखोरी करणार्या तरुणांना सोबतीला घेऊन अंबड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पादचारी महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेत होता. याप्रकरणी आणखीही संशयित अटक होण्याची शक्यता आहे. तसेच, संशयितांकडून चोरीचे सोने खरेदी करणार्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

Chain thief arrested in Indiranagar area. A team of Indiranagar Police Station along with it.
Nashik Crime News : दारूच्या नशेत मित्राचा खून! देवळा पोलिस ठाण्यासमोर तणाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.