Nashik News : वीज मीटरमध्ये छेडछाड करताना गेल्या पाच वर्षांपासून वीज चोरी केली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ३७ हजार युनिट विजेची चोरी करताना आठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. (Crime Electricity theft for 5 years 8 lakh fraud)
अतिरिक्त कार्यकारी अधिकारी हरेश भावर यांनी या संशयिताविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित कमल पवार (५२, रा. पवननगर भाजी मार्केट, सिडको) याने घरातील वीज मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचे म्हटले आहे. (latest marathi news)
थोडे थोडके नव्हे तर तब्बल गेल्या पाच वर्षांपासून वीज चोरी सुरु असल्याचे नमूद केले असताना ३७ हजार युनिट अशी आठ लाख रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास अंबड पोलिस ठाण्याअंतर्गत केला जातो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.