Nashik Cyber Crime : भाजपच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट! शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Cyber Crime News : सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर बदनामीचे प्रकार घडू लागले आहेत.
Fake FB Account
Fake FB Account esakal
Updated on

नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर बदनामीचे प्रकार घडू लागले आहेत. फेसबुक या संकेतस्थळावर भारतीय जनता पक्षाच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून त्यावर भाजपसंदर्भात बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Nashik ​​Crime Fake Facebook account in name BJP marathi news)

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा मध्य मंडळ नाशिक महानगराचे अध्यक्ष अक्षय हेमंत गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, https://www.facebook.com/groups/1414868165534056 या लिंकवरील ‘बीजेपी महाराष्ट्र’ नावाच्या ग्रुपविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ‘बीजेपी महाराष्ट्र’ या नावाचे बनावट अकाऊंट असून, त्यावर पक्षाच्या नावाचा, चिन्हाचा गैरवापर करून बदनामीकारक पोस्ट केल्याचे आमदार देवयानी फरांदे यांच्या निदर्शनास आले. (latest marathi news)

Fake FB Account
Nashik Cyber Crime: पेट्रोलपंपाच्या नावाखाली तब्बल 46 लाख 44 हजारांची फसवणूक! किराणा व्‍यापाऱ्याकडून सायबर पोलिस ठाण्यात तक्रार

त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेतल्यावर संबंधित ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही काही पोस्ट असल्याचे दिसून आले. त्यामुळे गांगुर्डे यांनी याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिसांनी फेसबुककडे याप्रकरणी पत्रव्यवहार करीत अधिक माहिती मागविली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर संशयितांविरोधात पुढील कारवाई होईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी सांगितले.

यापूर्वीही एक गुन्हा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे वातावरण तापू लागले आहे. काही दिवसांपूर्वीच इंदिरानगर परिसरातील एका भिंतीवर भाजप चिन्हालगतच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षाचे चिन्ह रेखाटून ‘रोजगार दो...’ असे रेखाटले होते. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.

Fake FB Account
Cyber Crime: फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री नको रे बाबा! व्यापारी 95 लाखांना बुडाला; कशी झाली फसवणूक?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.