नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध व्यावसायिकांसह गुन्हे दाखल असलेल्यांना शहर पोलिसांनी तडीपार केले आहे. असे असताना पुन्हा दुसऱ्या दिवशी १४ तडीपार केलेले शहरातच आढळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात माजी नगरसेवकांसह सराईत गुन्हेगारांचाही समावेश आहे. दरम्यान, तडीपारीच्या नोटिसा बजाविण्यातून पोलिस आयुक्तालयात असमन्वयाचा अभाव दिसून आला आहे.