Nashik Crime : मुंबई-आग्रा महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात घोटी टोलनाका याठिकाणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले असता, त्याविरोधात घोटी पोलिसात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु या संशयितामध्ये ग्रामीण पोलीसांनी दिवंगत पदाधिकारी शोभा मगर यांच्याही नावाचा समावेश आहे. यावरून ग्रामीण पोलीस अन् त्यांच्या गोपनीय शाखेचा भोंगळ कारभारच अधोरेखित झाला आहे. दरम्यान, सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर मयत मगर यांचे नाव वगळण्यासाठीची प्रक्रिया ग्रामीण पोलीसांकडून सुरू आहे. (crime filed against late Shobha Magar in Ghoti Toll Naka UBT agitation case)
महामार्गावरील घोटी येथील टोलनाका येथे सोमवारी (ता. २२) शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर-जिल्हा पदाधिकाऱ्यांनी महामार्गांवरील खड्ड्यांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात जारी केलेल्या जमावंबदी आदेशाचे उल्लघंन झाले होते. तसेच, महामार्गावरील वाहतूक किमान तासभर ठप्प झाली होती. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्याचे अंमलदार निलेश साळवे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला.
यावेळी घटनास्थळी असलेल्या घोटी पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाच्या अंमलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार निर्मला गावीत, निवृत्ती जाधव, कुलदिप सिंग चौधरी, राजू नाठे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, निवृत्ती लांबे, रमेश धांडे, सचिन मराठे, केशव पोरजे, महेश बडवे, नितीन लाखन, समाधान बोडके, प्रशांत दिवे, पवन मटाले, राहुल ताजनपुरे, योगेश गाडेकर, वैभव ठाकरे, मसूद जिलानी आदींसह दोनशे ते अडीशचे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)
मात्र, या नावांमध्ये दिवंगत पदाधिकारी शोभा मगर यांच्याही नावाचा समावेश करण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाल्याने ग्रामीण पोलिसांचा अजब-गजब कारभारच अधोरेखित झाला आहे.
मगर यांचे २०२३ मध्ये निधन
शोभा मगर यांचे नोव्हेंबर २०२३ मध्ये निधन झाले आहे. तसेच, त्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या. तत्पूर्वी त्या शिवसेनेच्या पदाधिकारी होत्या. असे असताना, ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल करीत असताना शहानिशा न करता केवळ ऐकिव माहितीनुसार नावे घेत गुन्हा दाखल केला. यातून ग्रामीण पोलिसांची बेजबाबदारी अन् भोंगळ कारभारच उघड झाल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात चौकशीचे आदेशही पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
"सदर गुन्ह्यात दिवंगत महिला पदाधिकाऱ्यांचे नाव अनावधानाने समाविष्ठ झाले असून, ते नाव वगळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे."
- आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.