Nashik Crime News : जबरी चोरी करणारा संशयित जेरबंद; आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी

Crime News : या संशयिताकडून एक मोबाईल, एक दुचाकी असा एकूण सतावन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Suspects and items arrested in the case of forcible theft in Adgaon. Along with Adgaon Police Station team.
Suspects and items arrested in the case of forcible theft in Adgaon. Along with Adgaon Police Station team.esakal
Updated on

पंचवटी : जबरी चोरी करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयिताकडून एक मोबाईल, एक दुचाकी असा एकूण सतावन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे (२६, रा. जुना जानोरी रोड, शिंदे मळा, न्यू इंग्लिश स्कूल पाठीमागे, आडगाव शिवार) असे संशयितांचे नाव असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. (Nashik Crime Forcible theft suspect jailed)

आडगाव शिवारातील मुंबई - आग्रा महामार्गावरील हॉटेल विमल जवळ जनार्दन पुंडलिक उनव्हणे (५६) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. १९ मे रोजी आडगावातून घराकडे ते जात होते. त्यावेळी मुंबई - आग्रा महामार्गावर आडगाव त्रिफुली पुढील बोगद्याजवळ दुचाकीहून आलेल्या दोघा संशयितांनी उनव्हणे यांच्याजवळ येऊन पैशांची मागणी केली. त्यांच्याजवळील विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच फोन पेचा पिन विचारून तीन हजार रुपये देखील काढून घेतले होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाढती जबरी चोरी, मोबाईल चोरी गुन्हे बघता उकल करण्यासाठी आदेशित केले होते. त्यानुसार परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलिस ठाण्याचे प्रवीण चव्हाण व आडगाव गुन्हे शोध पथक सदर गुन्ह्यातील संशयितांचा माग काढत होते. (latest marathi news)

Suspects and items arrested in the case of forcible theft in Adgaon. Along with Adgaon Police Station team.
Sambhajinagar Crime: रिश्वत मत लेना, गब्बर आ जायेगा! संभाजीनगरमध्ये पत्राने खळबळ; राजकीय नेत्यांसह पोलिसांच्या हत्याकांडाची धमकी

यातील संशयित हा आडगावात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकास मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून संशयित अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे यास अटक करून, त्याची कसून चौकशी केली असता सदर गुन्हाची कबुली दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण दाइंगडे करीत आहेत.

यांनी बजाविली कामगिरी

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण दाइंगडे, मयुर निकम, पोलिस सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, ज्ञानेश्वर कहांडळ, दादासाहेब वाघ, दिनेश गुंबाडे, सचिन बाहिकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.

Suspects and items arrested in the case of forcible theft in Adgaon. Along with Adgaon Police Station team.
Crime News : गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.