Nashik Crime News : म्हसरुळला कारमधून विदेशी मद्यसाठा जप्त; शहर पोलिसांनी आवळला अवैध मद्याविरोधात फास

Nashik Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैधरीत्या देशी-विदेशी मद्याची तस्करी वाढल्याने शहर गुन्हे शाखेचे पथकेही सतर्क झाले आहेत.
Foreign liquor stock seized along with car from Mhasrul area. including the Special Squad of the City Crime Branch.
Foreign liquor stock seized along with car from Mhasrul area. including the Special Squad of the City Crime Branch.esakal
Updated on

Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैधरीत्या देशी-विदेशी मद्याची तस्करी वाढल्याने शहर गुन्हे शाखेचे पथकेही सतर्क झाले आहेत. त्यामुळे म्हसरुळ हद्दीमध्ये विदेशी मद्याची तस्करी करताना फोक्स-वॅगन कारसह मद्यसाठा असा सुमारे २ लाख ८६ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच, आयुक्तालय हद्दीतूनही ठिकठिकाणी छापेमारी करीत अवैध धंद्यांचे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत. (Nashik Crime Foreign liquor stock seized from car in mhasrul marathi news)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अवैध धंदे, मद्यविक्री, शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांच्या पथकांनी चांगलाच फास आवळला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी हत्यारे बाळगणारे, अवैध देशीदारुचे अड्ड्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे.

शहर गुन्हे शाखेच्या विशेष शाखेचे अंमलदार भारत डंबाळे यांच्या फिर्यादीनुसार, पेठ रोडवरील म्हसरुळ हद्दीमध्ये अवैधरीत्या मद्याची तस्करी होत असल्याची खबर अंमलदार गणेश वडजे यांना मिळाली होती. ही माहिती विशेष पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार, पेठ रोडवरील सप्तरंग सोसायटीसमोरील हिरा-घुंगरू बारसमोर पथकाने सापळा रचला.

कार (एमएच १९ बीजे ६९१०) मध्ये विदेशी मद्याचा साठा केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पथकाने संशयित गौरव प्रकाश चव्हाण (३८, रा. बुधवार पेठ, जुने नाशिक) यास अटक केली. संशयित चव्हाण हा हॉटेल चालक असून त्याने अवैधरीत्या विदेशी मद्य व बिअरचा साठा करून विक्रीचा प्रयत्न केला. संशयित चव्हाण याच्याकडे मद्यविक्रीचा परवाना नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

Foreign liquor stock seized along with car from Mhasrul area. including the Special Squad of the City Crime Branch.
Nashik Crime News : कारमधून गांजाची तस्करी! 100 किलो गांजा जप्त; विशेष पथकाची कामगिरी

याप्रकरणी विशेष पथकाने कारसह मद्यसाठा असा २ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा ऐवज जपत केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे व सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार किशोर रोकडे, भारत डंबाळे, रवींद्र दिघे, बाळासाहेब नांद्रे यांनी बजावली.

पंचवटी, अंबड, नाशिक रोडला कारवाई

अवैधरीत्या मद्यविक्री प्रकरणी अंबड, पंचवटी व नाशिकरोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली आहे. पंचवटीतील फुले नगरच्या म्हाडा वसाहतीत संशयित उमेश सुनील साबळे (२६, रा. कालिका नगर, फुले नगर) यास २ हजार ९० रुपयांची देशी दारूची विक्री करताना अटक केली.

तर, अंबड हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारील पत्र्याचे शेडमध्ये संशयित विशाल राजेंद्र पाटील (३३, रा. कार्बन नाका, शिवाजीनगर, सातपूर) यास १८९० रुपयांच्या देशी दारू समवेत अटक केली आहे. तर नाशिक रोडच्या शिंदे गावात अमरधाम रोडवरील मोकळ्या जागेत संशयित सचिन मारुती गव्हाणे (४३, रा. शिंदे गाव) याच्याकडून १७०० रुपयांची देशी दारू जप्त केली.

Foreign liquor stock seized along with car from Mhasrul area. including the Special Squad of the City Crime Branch.
Nashik Crime News : कत्तलीसाठी आणलेल्या गायींची सुटका! गुन्हेशाखा युनिट एकची कारवाई; एकाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.