वणी : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघा परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांना वणी पोलिसांनी अहमदाबाद (गुजरात) येथून ताब्यात घेतले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता १७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Nashik Crime Foreign traders cheated grape growers)
याबाबत माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील द्राक्ष उत्पादक शंकर बाळकृष्ण बैरागी (वय ५२) यांच्याकडून परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांनी ६ लाख १ हजार रूपयांचा द्राक्षमाल खरेदी करून पैसे देण्यास नकार दिला होता. याप्रकरणी लोकेंद्र सिंह, दिवान सिंह, सुनील सिंह, अनिल सिंह (रा.फत्तेपूर सिक्री, हसनपुरा, आग्रा, हल्ली मुक्काम खेडगाव, ता. दिंडोरी) यांच्याविरोधात १६ मार्च रोजी वणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोकेंद्र सिंह, दिवान सिंह यांनी बैरागी यांच्या शेतात ५ फेब्रुवारी रोजी द्राक्षबागेचा २५ रुपये प्रतिकिलो असा व्यवहार करुन ८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान शंकर बैरागी यांच्याकडून २५ हजार १०० किलो द्राक्ष खरेदी केले. सदर व्यवहारापोटी ६ लाख २७ हजार ५०० रुपयांपैकी २६ हजार रुपये रोख देवून उर्वरीत ६ लाख १ हजार ५०० रूपये फिर्यादीला वारंवार मागणी करुनही दिले नाही. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने वणी पोलिसांचा तपास सुरू होता. (latest marathi news)
गुजरातमधून ठोकल्या बेड्या
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले होते. पथकप्रमुख विजयकुमार कोठावळे होते. पोलिसांनी अहमदाबाद (गुजरात) येथून दिवाण चंद्रभान सिंह व सुनील चंद्रभान सिंह यांना १३ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. दोघा संशयितांना न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तपास पथक पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे, पोलिस अंमलदार विजय लोखंडे व कुणाल मराठे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.