Nashik Fraud Crime : पखाल रोड परिसरामध्ये बांधकाम व्यावसायिकाने मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम करताना वाढीव बांधकाम केले. तसेच, फ्लॅट व गाळ्यांचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र न देताच त्यांची विक्री करून फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या फ्लॅटधारकाने न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाच्या आदेशानुसार बिल्डरविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Fraud by increasing construction of building)
वरुण बिल्डर्सचे संशयित संचालक लच्छमण कोरामल मुलाणी (७०, रा. सिद्धिविनायक पार्क, अशोका मार्ग, नाशिक), महेश हिरालाल पंजवानी (४४, रा. विहार बंगलो, येवलेकर मार्ग, कॉलेजरोड, नाशिक) अशी संशयित बिल्डरची नावे आहेत.
फय्याज उस्मान पठाण (रा. राजहिरा प्राईड, पखालरोड) यांच्या फिर्यादीनुसार, १ जुलै २०१५ ते २९ मे २०२४ या कालावधीत तीन आणि नऊ या मिळकतीविषयी खरेदीखता पोटी साठेखत करारनामा, आपसमजूत पत्र करण्यासाठी संशयित बिल्डरांनी पठाण यांच्यासह फ्लॅटधारकांकडून पैसे घेतले. मात्र, रक्कम घेऊनही खरेदीखत करून न देता पैशांचा अपहार केला. (latest marathi news)
संशयितांनी इमारत विक्रीवेळी दाखविलेला बिल्डींगचा नकाश आणि सर्टिफिकेटपेक्षा जास्त मजले बांधून बेकायदेशीररीत्या इमारतीवर अतिक्रमण केले. वाढीव बांधकाम करून विश्वासघात करत बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही दिला नाही. तसेच, फ्लॅटधारकांना गुंडामार्फत धमकावले.
या इमारतीतील फ्लॅटस्ला नवीन ग्राहक आणून संशयित ते विक्रीच्या बेतात आहे. असेही तक्रारदारांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्याप्रकरणी, न्यायालयाने मुंबई नाका पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक श्री. शेख करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.