Nashik Fraud Crime : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धेची फसवणूक!

Nashik News : वृद्‌धेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत एका संशयिताने मदतीचा बहाणा केला आणि एटीएम कार्डची अदलाबदल करून ३० हजार रुपये तिच्या खात्यातून काढून घेत फसवणूक केली.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik News : जेलरोड येथे बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या वृद्‌धेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत एका संशयिताने मदतीचा बहाणा केला आणि एटीएम कार्डची अदलाबदल करून ३० हजार रुपये तिच्या खात्यातून काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud elderly by exchanging ATM cards)

अलका शिवाजी पाटील (रा. हिंदशक्तीनगर, जेलरोड) या ६४ वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार, त्या सोमवारी (ता. २७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास जेलरोड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएममध्ये आल्या होत्या.

त्यावेळी एटीएमजवळ एक संशयित उभा होता. त्याने अलका पाटील यांच्या वयस्कपणाचा फायदा घेत त्यांना एटीएममधून पैसे काढून देण्याची मदत करण्याचा बहाणा केला.

Fraud Crime
Gadchiroli Crime : गडचिरोली तालुका हादरला! कुऱ्हाडीने पत्नीचे मुंडके केले धडावेगळे

त्यानंतर त्याने हातचलाखीने त्यांच्याकडील एटीएमची अदलाबदल केली आणि त्याच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये काढून घेत यांची फसवणूक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud Crime
Nashik Crime News : दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास; शहरात चोरट्यांचा धुडगूस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.