Nashik Crime News : मित्रानेच काढला मित्राचा काटा! सराईत ठमकेच्या खून प्रकरणी दोघांना अटक

Crime News : मयत ठमके हा मुख्य संशयिताच्या पत्नीची बदनामी करीत असल्याने त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच दोघांनी मिळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
Two suspects arrested in Chetan Thamke murder case on Eklahare Road. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Two suspects arrested in Chetan Thamke murder case on Eklahare Road. Along with the team of Unit One of the City Crime Branch.esakal
Updated on

नाशिक : गेल्या रविवारी एकलहरे रोडवर सराईत गुन्हेगार चेतन ठमके याच्या खूनाचा शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अखेर उलगडा केला असून, दोघा मित्रांना अटक करण्यात आली आहे. मयत ठमके हा मुख्य संशयिताच्या पत्नीची बदनामी करीत असल्याने त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच दोघांनी मिळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Nashik Crime murder of criminal thamke marathi news)

पंकज विनोद आहेर  (२५, रा. महाकाली चौक, सिडको, नाशिक), आशिष रामचंद्र भारद्वाज ( २५, रा. शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. चेतन आनंदा ठमके (२४, रा. विजयनगर, सिडको) याचा खून झाला होता. 

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या रविवारी (ता. १८) सकाळी एकलहरे रोडलगत चेतनचा रक्ताने माखलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हेशाखा युनिट एकचे पथक करीत असताना अंमलदार मुक्तार शेख, अप्पा पानवळ यांना या गुन्ह्यातील दोघे संशयित सातपूर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली असता, त्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना देण्यात आली.

त्यानुसार, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, सुगन साबरे, देविदास ठाकरे, मिलिंदसिंग परदेशी, मुक्तार शेख, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, राजेश राठोड यांच्या पथकाने दोघा संशयितांना सापळा रचून शिताफीने अटक केली. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता व ॲक्टीवा मोपेड असा ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासासाठी दोघांना नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Latest Marathi News)

Two suspects arrested in Chetan Thamke murder case on Eklahare Road. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Nashik Crime : इमारतीच्या डबक्यामधील गोणीत आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह; हत्या झाल्याचा संशय

यामुळे काढला काटा

मयत चेतन व मुख्य संशयित पंकज हे चांगले मित्र होते. मात्र, चेतन गेल्या काही दिवसांपासून पंकज याच्या पत्नीची बदनामी करीत होता. त्यावरून त्यांच्यात वादही झाला. पंकजने समजावून सांगूनही चेतन ऐकत नव्हता. त्यामुळे पंकज व आशिष यांनी मिळून चेतन यास गेल्या शनिवारी (ता. १७) रात्री ॲक्टिवावर बसवून एकलहरे रोडवरील निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी चेतनला मारहाण करून कोयत्याने त्याच्यावर वार करीत ठार मारल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. 

"ठमके खुनप्रकरणाचा समांतर तपास करीत असताना संशयितांची खबर मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघा संशयितांना अटक केली आहे. मयत व मुख्य संशयित मित्र असून वादातून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे."

- अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा युनिट एक

Two suspects arrested in Chetan Thamke murder case on Eklahare Road. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Crime News: याचिका मागे घे, नाहीतर मुलांना भेटू देणार नाही म्हणत विवाहितेला केली मारहाण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.