Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Nashik News : पानेवाडी इंधन प्रकल्पातून इतर राज्यात इंधन पुरवठ्यासाठी कंपनीच्या परिसरात पानेवाडी रेल्वे इंधन धक्का (फिलॉग सेंटर) तयार करण्यात आला आहे.
Fuel wagons on railway fuel shocks.
Fuel wagons on railway fuel shocks.esakal
Updated on

मनमाड : पानेवाडी इंधन प्रकल्पातून इतर राज्यात इंधन पुरवठ्यासाठी कंपनीच्या परिसरात पानेवाडी रेल्वे इंधन धक्का (फिलॉग सेंटर) तयार करण्यात आला आहे. या इंधन धक्क्यात उभ्या असलेल्या वॅगनमधून इंधन चोरी होत असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ छापा टाकत चार हजार रुपयांचे जवळपास ४० लिटर डिझेल, पेट्रोल हस्तगत केले असून, सहा जणांना अटक करण्यात आली आहे. (From railway employee Theft of fuel in Panewadi)

सहाही जण रेल्वे कर्मचारी असल्याने या कारवाईची चर्चा तालुक्यात रंगली असली तरी केलेल्या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळली जात आहे. पानेवाडी शिवारातून टँकरद्वारे उत्तर महाराष्ट्रात आणि रेल्वेद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यांत इंधनाची वाहतूक होते. या कंपन्यांच्या प्रकल्पालगत रेल्वेच्या वॅगन डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र टर्मिनल आहे.

इंधनाने भरलेली रेल्वे गाडी सायडिंगला उभी राहाते. रेल्वे वॅगनमधील पेट्रोल आणि डिझेल कॅनमध्ये भरून त्याची चोरी होते, अशी गुप्त माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला मिळाली. पथक निरीक्षण करत असताना गुरुवारी सकाळी पानेवाडी येथे धाव घेऊन सापळा लावला. त्यात प्रवीण शिंदेसह पाच व्यक्ती रेल्वे वॅगनमधून इंधन चोरी करताना आढळून आले.

त्यांच्याकडे प्लॅस्टिक कॅनमध्ये भरलेले चार हजार रुपये किमतीचे ४० लिटर पेट्रोल, डिझेल मिळून आले. प्रवीण शिंदेसह पाच जणांविरोधात आरपीएफ कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली. यातील सर्वच जण हे रेल्वे कर्मचारी असल्याने मोठी खळबळ उडाली. गेल्या काही वर्षांपासून परिसरात इंधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. मात्र आज झालेल्या कारवाईमुळे यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी इंधन चोरी आता किती दिवस थांबणार, असा प्रश्‍न आहे.

Fuel wagons on railway fuel shocks.
Chhatrapati Sambhajinagar Crime : म्हणे, जादू करून देतो एक लाखाचे तीन लाख!

अनेक वर्षांपासून गोरखधंदा

मनमाड-नांदगाव रस्त्यावरील पानेवाडी येथील इंधन कंपन्यांच्या साठवणूक केंद्रातून दररोज रेल्वे वॅगनद्वारा तीन ते चार रॅक राज्यासह परप्रांतात पाठविले जातात. एका रॅकमध्ये ५२ वॅगन असतात. एक वॅगनमध्ये ६५ किलोलिटर पेट्रोल किंवा डिझेलचा समावेश असतो. त्यासाठी पानेवाडी येथे स्वतंत्र रेल्वे इंधन धक्का (फिलॉग सेंटर) तयार करण्यात आले आहे.

या वॅगनमधून पेट्रोल, डिझेलच्या पातळीच्या तपासणीसाठी रेल्वे कामगारांची नियुक्ती करण्यात आली. रेल्वे वॅगनचे वॉल उघडून संगनमताने गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर डिझेल व पेट्रोल चोरी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या इंधन चोरीची पाळेमुळे खणून काढण्याचे मोठे आव्हान रेल्वे सुरक्षा बलापुढे आहे.

Fuel wagons on railway fuel shocks.
Crime News: वीस रूपयांसाठी पोलिसाने दुकानदाराचे फोडले नाक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.