Nashik Crime News : शासकीय वाळू डेपोत टोळक्याचा धुमाकूळ; एकाला अटक

Nashik Crime : एक लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार निफाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime News : येथे शासकीय वाळू डेपोवर वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने दरोडा घालून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची वाळू आणि पंधरा हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार निफाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी एका संशयिताला अटक कऱण्यात आली आहे. (Gang arrested at Government Sand Depot)

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्याकडून प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार १५ जून २०२४ ला रात्री दहाच्या सुमारास मौजे जळगाव तालुका निफाड येथील गट क्रमांक ४२६ आणि ४२३ मध्ये असलेल्या मेसर्स टी. ई. जंजिरे इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स या शासकीय वाळू डेपोत वाळू चोरीचा पूर्वनियोजित कट रचून या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिक मीटरच्या आणि सीसीटीव्ही च्या वायर्स कापण्यात आल्या, त्यानंतर वीज पुरवठा खंडित करून वीस ते पंचवीस जणांच्या टोळीने फिर्यादी आणि साक्षीदार यांना लोखंडी सळईचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केली.

Crime News
Nashik Crime News : न्यायालयाच्या आदेशाने जीवे मारण्याचा गुन्हा दाखल

पाच ते सात ट्रॅक्टर आणि जेसीबी मशिनच्या सहाय्याने या डेपोवरील ४० ते ५० ब्रास वाळू तसेच फिर्यादीकडील पंधरा हजार रुपये रोख आणि वाळूच्या पावत्या असा एकूण १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत कल्पेश कैलास कुंदे (रा. निफाड) यांनी निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. निफाड पोलिसांनी संशयित आरोपी प्रवीण वडघुले, शुभम वडघुले, अमोल देशमुख, उत्तम निरभवणे, पप्पू ऊर्फ चेतन सुधाकर निर्भवणे आदींसह २० ते २५ जणांविरुद्ध चोरी, दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे, पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील, उपनिरीक्षक आनंद पठारे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनाक्रम समजावून घेतला. या प्रकरणातील संशयित उत्तम निर्भवणे यास पोलिसांनी अटक केली असून त्याला २१ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Crime News
Nashik Bribe Crime News : स्वतंत्र रेशनकार्ड करण्यासाठी सेतू कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.