Nashik Crime : टोळक्याचा पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण

Latest Crime News : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून संशयितांनी हॉकी स्टीक, लाकडी दांडके, धारदार हत्याराने मारत पानटपरी चालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
beating
beatingesakal
Updated on

नाशिक : नाशिक - पुणे रोडवरील पानटपरीवर आलेल्या संशयित टोळक्याकडे सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून संशयितांनी हॉकी स्टीक, लाकडी दांडके, धारदार हत्याराने मारत पानटपरी चालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी टोळक्याविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हर्षल राजेंद्र देवरे (२३, रा. राधास्मृती सोसायटी, पाथर्डी रोड, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची नाशिक-पुणे रोडवरील घंट्या म्हसोबा महाराज मंदिराजवळ पानटपरी आहे. ( gang fatally attacked Pantapar shopper in highway )

मंगळवारी (ता. २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयित लखन काशिद (रा ट्रॅक्टर हाऊसजवळ, जुने नाशिक), क्रिश शिंदे (रा. कोळीवाडा) यांच्यासह पाच ते सहा संशयित पानटपरीवर आले. त्यासाठी संशयितांनी देवरे यांच्याकडून सिगारेट घेतल्या. या सिगारेटचे पैसे मागितले असता, संशयित लखन याच्यासह साथीदारांनी त्यांच्याकडील हॉकी स्टीक, लाकडी दांडक्याने आणि धारदार हत्याराने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.

या मारहाणीमध्ये देवरे यांच्या हाता-पायांना, पाठीला, कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण केल्यानंतर संशयितांनी पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयित टोळक्याविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक सुयोग वायकर हे तपास करीत आहेत.

beating
Nashik Crime : सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून; पाथर्डी गावातील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.