Nashik Crime: दुचाकीस्वारास मारहाण करून रोकड लुटणारी टोळी जेरबंद; MIDC पोलिसांची कामगिरी; चोरीची साडेसात लाख रुपये रक्कम हस्तगत

Crime News : त्यांच्याकडून चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेल्या एका कारसह दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.
Police & Team
Police & Teamesakal
Updated on

वावी : कॅश मॅनेजमेंट कंपनीमध्ये कॅश एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला असलेल्या युवकास सिन्नर-नाशिक महामार्गावरील महोदरी घाटात दुचाकी अडवून मारहाण करत त्याच्याजवळची सात लाख 53 हजार रुपये रोख रक्कम व दुचाकी लांबवणाऱ्या आठ जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेल्या एका कारसह दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. (Gang who beat bikers looted cash jailed)

29 जुलै रोजी दुपारी रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनी चेन्नई या कंपनीच्या पुणे शाखेत कॅश एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला असलेला सागर नंदू चौधरी हा त्याच्याकडील सिन्नर शहर व ग्रामीण भागातील मॉल, व्यावसायिक यांनी दिलेली बँक भरणा करावयाची रक्कम तसेच ग्राहक बँकांचे धनादेश घेऊन दुचाकीवरून जात होता.

तो मोहदरी घाटात आल्यावर पाठीमागून आलेल्या विना क्रमांकाच्या दोन दुचाकी वरून आलेल्या सहा जणांपैकी एकाने त्याच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला. तो जखमी झाल्यावर इतरांनी हॉकी स्टिक व लाथा बुक यांनी त्यास मारहाण केली. त्याच्याजवळची सात लाख 53 हजार 416 रुपये रोख रक्कम व धनादेश असलेली बॅग हिसकावून घेत त्याचीच दुचाकी घेऊन पसार झाले होते.

याप्रकरणी सागर चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे , एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी यमुनाचा तपास सुरू केला होता.

त्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक व गून्हे शाखेचे दुसरे समांतर तपास करत होते. फिर्यादी चौधरी हा सिन्नर शहरातील ज्या ग्राहकांकडे रोख रक्कम व धनादेश जमा करण्यासाठी जात होता त्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली. मात्र चौधरी याच्या मागावर कोणीही नसल्याचे स्पष्ट झाले होते. गुन्हा करणाऱ्यांनी चौधरी यांची नाशिककडे जाण्याची वेळ निश्चित करून मोहदरी घाटात त्यांच्यावर हल्ला केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. (latest marathi news)

Police & Team
Nashik Crime News : राका कॉलनीत माजी नगरसेविकेचे घर फोडले; कोट्यवधींचे दागिने चोरीला

पोलीस निरीक्षक श्री. बाविस्कर यांना खबऱ्यामार्फत अमोल अरुण ओढेकर रा. शिंदेगाव व शुभम विजय पवार रा. पळसे या दोघांची नावे समजली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला उडवलीची उत्तरे देण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आपल्या साथीदारांची नावे सांगितली.

त्यानुसार महेश सतिश पठारे रा. विंचुर ता.निफाड , गौरव प्रभाकर भवर रा.मानोरी खुर्द ता.निफाड, सागर एकनाथ चव्हान रा. विंचूर ता. निफाड, प्रसाद आनंदा गायकवाड रा. मानोरी बु ता. येवला, गणेश रमेश गायकवाड रा.मानोरी खुर्द ता. निफाड, सुरज प्रकाश पाकळ रा. शिर्डी ता. राहता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या गुन्ह्यात संशयीतांनी दोन मोटार सायकल व मारुती इटींगा कार वापरल्याचे देखील सांगितले. गुन्ह्यातील लुटलेली रोख रक्कम सात लाख 53 हजार रुपये त्यांनी आठ जनांमध्ये वाटुन घेतले होते . ही संपूर्ण रक्कम व फिर्यादी चौधरी यांची पळवलेली दुचाकी असा सात लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला.

पोलीस उपनिरिक्षक किशोर पाटील, पोलीस अंमलदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे, जयेश खाडे तसेच गुन्हे शाखेकडील तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रदिप बहीरम, हेमंत गिलबीले यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला.

संशयित आरोपी महेश पठारे रा. विंचुर याचेवर लासलगाव पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट व मारहान असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच सुरज पाकळ रा. शिर्डी याचेवर अहमदनगर जिल्ह्यात फसवणुक करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Police & Team
Nashik Crime News : सोनसाखळी चोरटे 24 तासांत जेरबंद; शहर गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.