Nashik Crime News : पावणे पाच लाखांचा गांजा आडगाव परिसरातून जप्त; दुचाकीसह संशयिताला अटक

Nashik Crime : आडगाव शिवारातील धात्रक फाटा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयिताला आडगाव पोलिसांनी अटक केली.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime News : आडगाव शिवारातील धात्रक फाटा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयिताला आडगाव पोलिसांनी अटक केली. तर, त्याने फ्लॅटमध्ये दडवून ठेवलेल्या गांजाही युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेत सुमारे ४ लाख ७१ हजारांचा गांजा हस्तगत केला आहे. अशोक भावराव गिद (५९, रा. नंदन गार्डन बिल्डिंग, उपनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (Nashik Crime Ganja seized from Adgaon marathi news)

आडगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार दादासाहेब वाघ यांना संशयित गांजा विक्रीसाठी धात्रक फाटा परिसरात येणार असल्याची खबर मिळाली असता, त्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना दिली. त्यासंदर्भात सापळा रचून रविवारी (ता.१८) रात्री पावणे बाराच्या सुमारास संशयित गिद दुचाकीवरून (एमएच १५ इआर ४७९०) आला असता दबा धरून बसलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेतले.

crime
Nashik Crime News : सोशल मीडियावर अश्लिल चित्रफिती; सायबर पोलिसात गुन्हा

दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीमध्ये २.१२ किलो २४ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. तसेच त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मित्राच्या फ्लॅटमध्ये गांजा दडवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बळिराम चौकातील बालाजी अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून गोण्या जप्त करीत, एकूण ४ लाख ७१ हजार ८४० रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही कामगिरी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आडगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण, युनिट एकचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, सुभाष जाधव, पाथरे, नरवडे, सुरंजे, वाघ, काटकर, आव्हाड, देविदास ठाकरे, विलास चारोस्कर, राजेश राठोड, नितीन जगताप, मुक्तार शेख, राहुल पालखेडे यांच्या पथकाने केली. ( latest marathi news )

crime
Nashik Crime News : सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला अवैध मद्यसाठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.