Nashik Crime News : राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत गावठी दारू जप्त

Crime News : खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी येथून वाहन क्रमांक (क्र.एम एच ४८ एस २०३५) मधून गावठी दारूची वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळाली.
Subject goods and suspects seized by the State Excise Department
Subject goods and suspects seized by the State Excise Departmentesakal
Updated on

Nashik Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गरवारे पॉइंट, अंबड येथे अवैधरीत्या होणारी गावठी दारूची वाहतूक रोखत चारचाकी वाहनासह जप्त केली. उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्रमांक १ ने नायलॉनच्या गोणीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या घालून गावठी दारू वाहतूक करताना जप्त करून संशयित शाहनवाज रफीक मोमीन (वय ३५) यास ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये ९ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Gavathi Liquor Seized in State Excise Action)

Subject goods and suspects seized by the State Excise Department
Nashik Crime News : तडीपार संशयितांचा शहरात वाढता वावर! शहरासह जिल्हा पोलिसांसमोर आव्हान

खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी येथून वाहन क्रमांक (क्र.एम एच ४८ एस २०३५) मधून गावठी दारूची वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळाली. मुंबईहून नाशिककडे हे वाहन उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास दिसले. त्यास थांबवून वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये नायलॉनच्या गोण्यात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गावठी दारू भरलेला साठा आढळून आला.

वाहनचालक शाहनवाज रफीक मोमीन यास ताब्यात घेतले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत भरारी पथक क्रमांक-१ चे दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे व जवान सुनील दिघोळे, व्ही. ए. चव्हाण, गौरव तारे, हर्षल नांद्रे इत्यादी सहभागी होते.

Subject goods and suspects seized by the State Excise Department
Nashik Crime News : वाद मिटवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला! जमीनमालक अन बांधकाम व्यावसायिकात सुरू होता वाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.