Nashik Crime News : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ! पोलिस सुस्त; 5 महिलांचे मंगळसूत्र ओरबाडले

Crime News : शहरात खुलेआम गोळीबाराच्या घटना, चोऱ्या-घरफोड्या अन्‌ टवाळखोरांच्या हाणामाऱ्या नित्याच्याच झाल्या असताना, आता सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढले आहे.
Chain Snatching
Chain Snatchingesakal
Updated on

Nashik Crime News : शहरात खुलेआम गोळीबाराच्या घटना, चोऱ्या-घरफोड्या अन्‌ टवाळखोरांच्या हाणामाऱ्या नित्याच्याच झाल्या असताना, आता सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढले आहे. आयुक्तालय हद्दीत चार घटनांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी वेगवेगळ्या उपनगरांमध्ये चार महिलांचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलिस सुस्त अन्‌ चैनस्नॅचर मस्त, असे म्हणण्याची वेळी महिलांवर आली आहे. (Nashik Crime Gold chain thieves in city news)

कोणार्क नगरमध्ये सुनंदा नामदेव उदावंत (रा. स्वामी कृपा, कोणार्क नगर, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.९) सायंकाळी पावणे सात ते सातच्या सुमारास घराजवळील दत्त मंदिरापासून पायी जात होत्या. दुचाकीवरील दोघांपैकी एकाने उदावंत यांच्या गळ्यातील ४२ हजारांचे सोन्याची पोत बळजबरीने खेचून पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक मयूर निकम तपास करीत आहेत.

तर, दुसरी घटना पंचवटीतील टकले नगरमध्ये मंगळवारीच (ता.९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. प्रतिभा सुदर्शन सराफ (रा. गोदावरी चेंबर्स, टकले नगर, पंचवटी) या ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला टकले नगर फलकाजवळील क्लासिक आर्ट दुकानासमोरून पायी जाताना दुचाकीवरील एकाने त्यांच्या गळ्यातील ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

चैनस्नॅचिंगच्या दोन घटना इंदिरा नगर हद्दीत घडल्या. अरुणा दिलीप लोहार (रा. भवानी रो हाऊस, तुळजा भवानी नगर, पाथर्डी शिवार) या सोमवारी (ता. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास पायी जाताना प्राइड अपार्टमेंटजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३५ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून नेली.

याच भामट्यांनी त्याच रस्त्यावर काही अंतरावर पुन्हा एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेत पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक सोनार हे तपास करीत आहेत.   (latest marathi news)

Chain Snatching
Navi Mumbai Crime: खांदेश्वर, पनवेल व परिसरातुन बुलेट व इतर मोटारसायकल चोरी करणारी राजस्थानी टोळी गजाआड

रामसुब्रमन्यम्‌ के. अय्यर (रा. वास्तू पार्क, जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता.८) रात्री दहाच्या सुमारास त्यांची पत्नी घराबाहेर असताना संशयितांनी त्यांची दुचाकी अय्यर यांच्यासमोरच थांबवीत त्यांना काही कळायच्या आत गळ्यातील १ लाख २५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक सुयोग वायकर हे तपास करीत आहेत.

दोन दिवसांत ५ चैनस्नॅचिंग

जबरी चोरीचे गुन्हे : ४

सोन्याच्या पोती : ५

गेला मुद्देमाल : २ लाख ९२ हजार रुपये

"सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तांत्रिक विश्लेषणानुसार तपास करीत आहेत. लवकरच गुन्ह्यांची उकल होऊन संशयित गजाआड असतील."

- डॉ. सीताराम कोल्हे, सहायक पोलिस आयुक्त, शहर गुन्हे शाखा.

Chain Snatching
Crime News : धार्मिक व जातीय विषयांवरून लोकांना भडकवणाऱ्या पाच नेटकऱ्यांवर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.