वणी : वणी- सापूतारा रस्त्यावरील पांडाणे टोलनाक्यावर गुजरात राज्यातून अहिल्यानगर येथे विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आयशर वाहानाने चोरटी वाहतूक करताना वणी पोलिस व विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र नाशिक यांचे पथकाने संयुक्त कामगिरी करीत पकडला आहे. याबाबत सुरत येथील दोघा व्यापाऱ्यांसह पाच जणांवर वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gutkha worth 43 lakh seized from Pandane)