Nashik News : गाडी घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे यासाठी फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, तर पतीने पहिली पत्नी असताना दुसरा विवाह बेकायदेशीरपणे केला. बनावट कागदपत्र तयार करून नाव बदलून दुसऱ्या पत्नीला अंगणवाडी सेविका म्हणून लावलेदेखील. (Nashik Crime Harassment of wife by husband)
याप्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, बनावट दाखला देणारी सेतू कक्षातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल नाही. भुसे (ता. निफाड) येथील येथील माहेर व सोनेवाडी (ता. निफाड) येथील सासर असलेल्या शुभांगी संदीप बेंडकुळे या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पीडित महिलेचा पती संदीप दगू बेंडकुळे (२८) त्याची आई पाखराबाई दगू बेंडकुळे.
वडील दगू रंगनाथ बेंडकुळे, बहीण मीना खंडू गायकवाड (रा. अंबरनाथ, मुंबई), रंजना मिथुन कडाळे (रा. रौळस पिंप्री, ता. निफाड), संदीपची दुसरी पत्नी सविता बेंडकुळे या सर्वांवर शारीरिक व मानसिक छळ तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marati news)
संदीप याने सविताशी बेकायदेशीर विवाह केला. फिर्यादी महिला हिने सायखेडा पोलिस ठाण्यातही स्वतंत्र अर्ज दिला असून, त्यात सेतू कक्षातील कर्मचारी जयश्री पवार हिनेच नोकरी लावण्यासाठी सविताला बनावट दाखला दिल्याचे म्हटले आहे.
मात्र, तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सविता हिचे नाव कांचन प्रकाश शेळके असल्याबाबतचा पुरवणी जबाब फिर्यादी महिलेने दिला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.