Nashik Crime News : पूर्ववैमनस्यातून सफाई कामगाराचा निर्घृण खून; पंडित कॉलनीत संशयितांनी केले चॉपरने वार 

Latest Crime News : या घटनेमुळे अशोकस्तंभ, घारपुरे घाट परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Akash Dhanwate
Akash Dhanwateesakal
Updated on

Nashik Crime News : गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या दिवशी घारपुरे घाट परिसरात झालेला वाद आणि त्यापूर्वीही त्यांच्यातील पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार व सफाई कामगारावर संशयितांनी चॉपरने सपासप वार करीत निर्घृण खून केला.

पंडित कॉलनीत मंगळवारी (ता. १) पहाटे साडेसहाच्या सुमारास सदरची घटना घडली असून, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने एका अल्पवयीनसह तिघांना आठ तासात जेरबंद केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे अशोकस्तंभ, घारपुरे घाट परिसरात तणावपूर्ण शांतता  असून, पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  (Heinous murder of sweeper in Pandit Colony)

आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे (२१, रा. घारपुरे घाट) असे खून करण्यात आलेल्या  युवकाचे नाव आहे तर, अथर्व दाते, अभय तोरे याच्यासह एक अल्पवयीन संशयितांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलिसात याप्रकरणी आकाश धनवटे याच्या खूनप्रकरणी तिघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आकाश धनवटे हा वॉटरग्रेस कंपनीकडे सफाई कामगार होता. मंगळवारी (ता. १) पहाटे सहा-साडेसहाच्या सुमारास तो पंडित कॉलनीत सफाई करीत होत्या. त्यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या तिघा संशयितांनी चॉपर घेऊन त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अक्षय जीव वाचवून पलायन करीत असताना मेडिकलसमोरील कुंडीत अडकून पडला. तरीही संशयितांनी त्याच्यावर वार केले. त्यानंतर ते पसार झाले. 

घटनेची माहिती मिळताच उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सरकारवाड्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी आकाश यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान दुपारी साडेचारच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला. 

पोलिसांच्या श्वानपथकातील ‘गूगल’ श्वान व अंमलदार गणेश कोंडे यांनी संशयितांचा माग काढला असता, त्यादिशेने गुन्हेशाखा  युनिट एकच्या पथकाने तपास सुरू केला. याप्रकरणी सायंकाळी सरकारवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (latest marathi news)

Akash Dhanwate
हॉटेलमध्ये सेक्स केल्यानंतर अति रक्तस्त्राव होऊन तरूणीचा मृत्यू; बॉयफ्रेंड 2 तास ऑनलाईन उपाय शोधत होता

गणेशोत्सवातील वाद भोवला

संशयित तिघे व मयत आकाश यांच्यात २०२१ पासून वाद आहेत. त्याप्रकरणी दोघांविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल आहे. दरम्यान, गेल्या गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा त्यांच्यामध्ये गणपती बसविण्यावरून  वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संशयित आकाशवर पाळत ठेवून होते. त्यानुसार मंगळवारी पहाटे संधी मिळताच त्यांनी त्याच्यावर खूनी हल्ला केला. आकाशच्या शरीरावर ११ खोलवर वार असून, घटनास्थळी मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. 

घारपुरे घाट परिसरात तणाव

या घटनेमुळे अशोकस्तंभ व घारपुरे घाट परिसरात मंगळवारी सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आकाशचा मृत्यु झाल्याचे समजताच कुटूंबियांनी आक्रोश केला. जिल्हा रुग्णालयात नातलगांनी गर्दी केली होती.

Akash Dhanwate
Pachod Crime News : नांदर येथे गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.