नाशिक : जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपी हिमायत बेग ४५ दिवसांच्या सुटीनंतर पुन्हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल झाला आहे. सप्टेंबरमध्ये कागदपत्र व जामीनदारांची पूर्तता झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशाने बेगला मुक्त करण्यात आले होते. रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी (ता. ५) तो कारागृहात परतला. अटक झाल्यापासून प्रथमच त्याला पॅरोलवर सुटी मिळाली होती. गेल्या १४ वर्षांपासून हिमायत बेग तुरुंगातील अंडासेलमध्ये आहे.