Nashik Crime News : शहर परिसरात अवैधरीत्या मद्यविक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट सुरु असल्याचे चित्र सध्या शहरात सर्रास बघायला मिळत असून सार्वजनिक ठिकाणांवर सर्रासपणे मद्य विक्री केली जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान देशी मद्य विक्री करणाऱ्या संशयितांविरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nashik Crime Illegal liquor seller in city marathi news)
पहिल्या घटनेत विनापरवाना, बेकायदेशीररीत्या देशी दारुची विक्री करताना आढळून आलेल्या एकास पोलिसांनी फुलेनगर येथून अटक केली आहे. शिवाजी माळगे (वय ५२) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी (ता.१८) दुपारी एकच्या सुमारास पेठरोडवरील महापालिका बाजाराच्या भिंतीलगत अवैधरित्या मद्य विक्री करताना पोलिसांनी त्यास अटक केली असून, त्याच्याकडून एक हजार १६० रुपये किमतीचा देशीदारुच्या सीलबंद बाटल्या हस्तगत केल्या. पोलिस शिपाई वैभव परदेशी यांच्या फिर्यादीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे परिसरात टी स्टॉलच्या लगत अवैधरीत्या मद्यविक्री करणाऱ्या संशयित विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई नितीन शिंदे यांच्या फिर्यादीवरून संशयित केशव शिवराम सरोदे विरोधात फिर्याद दिली असून, त्यास अद्याप अटक केलेली नाही. गुरुवारी (ता. १८) रात्री नऊच्या सुमारास केलेल्या कारवाईत संशयिताकडून एक हजार ६८० रुपयांचा देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
तिसऱ्या घटनेत एकलहरा रोडवरील ट्रॅक्शन गेटजवळील भागात चिंचेच्या झाडाखालील मोकळ्या जागेत विना परवाना बेकायदेशीररीत्या मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रघुनाथ मंजोबा वाळके असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरोधात पोलिस शिपाई समाधान वाजे यांनी फिर्याद दिली आहे. (latest marathi news)
गुरुवारी (ता. १८) रात्री दहाच्या सुमारास केलेल्या कारवाईत संशयिताकडून दोन हजार ५२० रुपये किमतीच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. चौथ्या घटनेत अंबड परिसरात गुरुवारी (ता. १८) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अवैधरीत्या मद्य विक्री करणारा आढळून आला. पोलिस शिपाई अनिल कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव बाळासाहेब पारखे असे संशयिताचे नाव असून, चौदाशे रुपये किमतीचा मद्यसाठा त्याच्याकडून हस्तगत केला आहे.
चौघा जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल
वर्दळीचे ठिकाण असलेल्या नाशिक रोड भागातील सोमानी गार्डन समोरील हॉटेलमागे ठाण मांडत जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई राजेंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक गोडसे (रा. आनंद कॉम्प्लेक्स मागे, नाशिकरोड), चंद्रभान गांगुर्डे (रा. लॅमरोड, देवळाली कॅम्प), जितेंद्र कोटेचा (रा. आनंद नगर, नाशिकरोड), आणि राधेश्याम छाजेड (रा. रोकडोबावाडी, नाशिक रोड) अशी चौघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयितांकडून पंधराशे रुपये रोख जुगाराचे साहित्य जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.