नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे रामेश्वर शिवार देवळा येथे अवैध मद्यसाठा वाहतूक करताना जप्त करण्यात आला. (Nashik Crime Illegal liquor stock worth lakhs seized by State Excise Auction in Malegaon news)
लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरु असलेल्या गस्ती दरम्यान निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मालेगाव विभागाचे पथकाला मिळालेल्या बातमीनुसार ३० मार्च रोजी हॉटेल दुर्गा गार्डनसमोर नाशिक-देवळा रोडवर, रामेश्वर शिवार येथे दारुबंदी गुन्ह्यासाठी सापळा रचून वाहन तपासणी करताना पांढऱ्या रंगाच्या सहाचाकी मालवाहतूक वाहनाची (एमएच ०८ डब्ल्यू ७७२२) तपासणी केली असता प्रथमदर्शनी वाहन पूर्णतः रिकामे असल्याचे भासले. मात्र पूर्ण वाहन तपासणी केली असता वाहनात ड्रायव्हर केबिनच्या मागील बाजूस व ट्रॉलीच्या पुढच्या बाजूस एक चोर कप्पा तयार केलेला मिळून आला. त्यामध्ये २०१ मद्य बॉक्स आढळले.
यामुळे सुमारे १८०० लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनासह एकूण २३,१३,०८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ओमप्रकाश हिरालाल यादव रंगेहाथ मिळून आल्याने त्यास अटक केली असून वाहनचालक तसेच गुन्ह्यातील मद्यसाठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहनमालकाविरोधात व इतर ज्ञात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (latest marathi news)
या कारवाईसाठी विभागीय उपायुक्त उषा वर्मा व अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक अ.सू.तांबारे यांचे मार्गदर्शन लाभले. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मालेगाव विभागाचे निरीक्षक, लिलाधर वसंत पाटील, दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे, सागर लक्ष्मण नलवडे, सहा.दु.निरीक्षक वंदना देवरे, तसेच दीपक गाडे, श्याम पानसरे, प्रवीण अस्वले, दिगंबर पालवी, गोकूळ परदेशी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.