Nashik Crime News : अवैध सावकारी करणारा लागेना पोलिसांच्या हाती! पोलिस तपासावर संशयाची सुई

Latest Crime News : संशयित अवैध सावकार हा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये लिपीक असून, त्याने शहरातील काही पोलीसांच्या मदतीने हॉटेल वेटरला धमकावलेही आहे. याचाही तपास अद्याप पोलिसांकडून होत नसल्याने तपासावर संशय व्यक्त होतो आहे.
police
policeesakal
Updated on

Nashik Crime News : गंगापूर रोड परिसरातील हॉटेल वेटरचे काम करणार्यास १० टक्के व्याजाने सव्वा लाखांचे साडे आठ लाख वसुल करणारा अवैध सावकाराविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होऊनही अद्याप अटक झालेली नाही. संशयित अवैध सावकार हा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये लिपीक असून, त्याने शहरातील काही पोलीसांच्या मदतीने हॉटेल वेटरला धमकावलेही आहे.  याचाही तपास अद्याप पोलिसांकडून होत नसल्याने तपासावर संशय व्यक्त होतो आहे. (Illegal moneylender not yet caught by police)

दशरथ पंडित साबळे (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित अवैध सावकार सुनील अर्जून महाजन यासह पत्नी ज्योत्स्ना, दीपक महाजन व चुलत सासऱ्याविरुद्ध गंगापूर पोलिसांत खंडणीसह अवैध सावकारीचा गुन्हा दाखल आहे. पीडित साबळे हे सहकुटूंब पोलीस आयुक्तालयात आले आणि आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे कैफियत मांडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिस निरीक्षकांना थेट संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. 

असे असताना, गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटले मात्र अद्यापही संशयित महाजन हा पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. तर दुसरीकडे यापूर्वी पोलिसांनी अवैध सावकारी करणाऱ्यांना तत्काळ अटक करीत शहरातील अवैध सावकारी करणाऱ्यांना धडा शिकविला होता.

परंतु या गुन्ह्यात मात्र पोलिसांचा सुरू असलेला थंड तपास संशयास्पद असल्याचे समोर येते आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुरुवारी (ता. २६) संशयित महाजन याच्या घरी गेले असता, त्याने बळजबरीने आणलेला साबळे यांचा टीव्ही जप्त केला. (latest marathi news)

police
Dhule Crime News : मद्यपी पतीच्या मारहाणीत पत्नी ठार; सांगवी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

तर दुसऱ्या दिवशी संशयित महाजन हा कुटूंबियांसह पसार झाला आहे. संशयित महाजन पसार झाल्याने पोलिसांचे हसे झाले असले तरीही त्याचा शोध घेण्याची तसदीही पोलीस घेत नसल्याने संशयित महाजन याला पोलीस अटकेपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

ते पोलीस कोण?

दरम्यान, संशयित महाजन याच्या सांगण्यावरून शहरातील काही पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांनीही फिर्यादी साबळे यांना मोबाईल फोन करून धमकावले आहे. अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदाराने फोन केल्याचा दावा साबळे यांनी केला आहे. परंतु गंगापूर पोलिसांकडून फोन करणाऱ्या पोलीस कर्मचार्यांचाही शोध घेतला जात नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होते आहे.

police
जावई त्रास द्यायचा, मुलीचे आईवडील संतापले, रात्री बसस्टॅंडजवळ गाठलं अन् भयानक घडलं, कोल्हापुरातील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.