Nashik Crime News : सिडकोत अवैधरित्या देशीदारुची विक्री; एकाला अटक

Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर गुन्हेशाखेच्या पथकांकडून आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध मद्यविरोधात धडक मोहीम सुरू आहे.
Suspect with illegal country liquor stock in Cidco.
Suspect with illegal country liquor stock in Cidco. esakal
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर गुन्हेशाखेच्या पथकांकडून आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध मद्यविरोधात धडक मोहीम सुरू आहे. सिडकोत अवैधरित्या देशीदारुची विक्री करताना शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने एकाला अटक केली. (Nashik Crime Illegal sale of country liquor in cidco news)

रोशन संजय सूर्यवंशी (२२, रा. पंडितनगर, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. युनिट दोनचे अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना सिडकोत अवैधरित्या मद्यविक्री सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने पंडितनगरमधील मच्छी मार्केटच्या नाल्याजवळ संशयित रोशन हा चोरीछुप्यारितीने अवैधरित्या देशीदारुची विक्री करताना आढळून आला. (latest marathi news)

Suspect with illegal country liquor stock in Cidco.
Dhule Crime News : पावणेदोन लाख लूट प्रकरणी नाशिकचे 2 संशयित अटकेत

त्याच्याकडून पोलिसांनी ६ हजार ४४० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय पगारे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, संजय सानप, प्रवीण वानखेडे यांनी बजावली.

Suspect with illegal country liquor stock in Cidco.
Dhule Crime News : नकली मतदान कार्ड बनविणारे अटकेत; ‘एलसीबी’ची धडक कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.