Nashik Crime Rate Hike : गेल्या महिनाभरामध्ये शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, यामागे शहरात वाढीस लागलेले अवैध धंदे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आयुक्तालय हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी मारहाणीच्या घटना वाढल्या असून चोऱ्या-घरफोड्यांना आळा घालण्यात शहर पोलिस अपयशी ठरले आहेत. प्राणघातक हल्ले वाढले असून सर्रासपणे कोयते, तलवारीचा वापर मारहाणींमध्ये होत असल्याने शहरात पोलिस आहेत की नाहीत, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. (Nashik Crime in city increased No fear of city police)
शहर पोलिस आयुक्तांनी आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर गुन्हेशाखेच्या अखत्यारीत विशेष पथके नियुक्ती केली आहेत. मात्र, गुन्हेगारी घटनांना आळा बसण्याऐवजी मारहाणी, प्राणघातक हल्ले यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत. मारहाणीच्या सर्वाधिक घटना अंबडमध्ये १३, तर, नाशिकरोड हद्दीत ११ आणि उपनगरमध्ये १० गुन्हे दाखल आहेत. भद्रकालीतही ८ मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.
रात्री-बेरात्री टवाळखोरांकडून सर्रासपणे कोयते, तलवारींचा वापर करीत वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली जाते. यामागे शहरात वाढलेले अवैध धंदे असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये शहरात मटका, जुगार, अवैध मद्यविक्री यासारखे बेकायदेशीर धंदे सुरू झाले आहेत.
तर, रस्त्यालगतच्या चायनीज, खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर विनापरवानगी मद्याचे पार्सल विकले जातात. तिथेच मद्यपी मद्याच्या पार्ट्या करतात. याची सारी माहिती पोलिसांना असूनही कारवाई होत नसल्याने शहरात गुन्हेगारी वाढल्याचे नागरिक उघडपणे बोलत आहेत.
चोऱ्या-घरफोड्या आणि जबरी चोर्यांना अटकाव बसलेला नाही. सातत्याने या घटना घडत असून पोलिसांची गस्तीपथके निकामी ठरल्याचेच यातून स्पष्ट होते आहे. गेल्या महिनाभरात शहरात ४२ चोऱ्यांचे गुन्हे तर, २४ घरफोड्या आणि १७ जबरी चोऱ्यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर ५४ वाहनांच्या चोऱ्या चोरट्यांनी केल्या आहेत. (latest marathi news)
पार्सल पॉईंट बनले अड्डे
शहरात चायनीज, हातगाड्यांना रात्री १० वाजेपर्यंतच वेळ असताना, काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत चायनीज गाड्यावर विक्री सुरू असते. उपनगरीय परिसरात तर अशा हातगाड्यांवर मद्यांचे पार्सलही विक्री केली जाते. त्याठिकाणी पार्ट्या होऊन मद्यपींना ‘चकना’ही पुरविला जातो. यामुळे अनधिकृतरित्या सुरू झालेले पार्सल पॉईंट गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. याकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले आहे.
सावधगिरीचा इशारा
पुण्यात पोलिसांच्या हप्तेगिरी उघड झाल्याने नाशिकमध्येही अशाप्रकारे पोलिसांकडून हप्ते वसुली केली जात असल्याचे नेहमीच बोलले जाते. परंतु त्यावर सहसा कोणी भाष्य करीत नाही. परंतु काही जागरुक नागरिकांनी याविरोधात आवाज उठविण्याबाबत सोशल मीडियावर आवाहन केले आहे. तसेच, हप्ते वसुली करणाऱ्या पोलिसांचा पर्दाफाश करण्याचाही इशारा दिला आहे.
गेल्या ३० दिवसांतील गुन्हे
- खून : ४
- प्राणघातक हल्ले : ५
- दुखापत/मारहाण : ६८
- खंडणी : ५
- बनावट नोटा : २
- चोर्या : ४२
- घरफोड्या : २४
- जबरी चोऱ्या : १७
- वाहनचोरी : ५४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.