Nashik News : शहराच्या विविध भागांत वीज चोरीच्या प्रकरणांत वाढ होताना दिसत आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात गेल्या दोन दिवसांत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पंचवटी भागातही गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. वडाळा गावातील ६० फुटी रोड भागातही अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. (Crime Increase in electricity theft cases)
महावितरणकडून दिवसेंदिवस विविध प्रकारचे कर वाढ करत अवाचे सव्वा बिल आकारणी तसेच काहीवेळा मनमानी बिल दिले जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत. परिणामतः वीज चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे बोलले जात आहे. बहुतांशी नागरिकांना वाढीव बिल भरणे शक्य होत नाही.
मोठ्या थकबाकी पोटी वीज वितरण विभागाकडून त्यांचा वीज पुरवठा खंडित केला जातो. अशावेळेस काही ग्राहकांकडून चोरीछुपे वीज जोडणी करून वापर केला जातो. असाच काहीसा प्रकार पंचवटी पेठ रोड परिसरात घडला आहे. येथील विविध भागातील ग्राहकांचे वीज बिल थकबाकीपोटी विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यांच्याकडून अनधिकृतपणे जोडणी करून विजेचा वापर सुरू होता. (latest marathi news)
वीज वितरण विभागाचे पथक पाहणी दौरा करताना हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्याकडून त्या ग्राहकांवर कारवाई करत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या दोन दिवसांत अशाप्रकारे सहा गुन्हे दाखल झाले आहेत. वीज वितरण विभागाने ग्राहकांना दिलासा दिला नाही तर यापुढे अशाच घटना घडत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आवाक्यातील बिल द्यावे
अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी महावितरणने कुठलातरी एकच कर लागू करत ग्राहकांच्या आवाक्यातील बिल द्यावे. वीजदर कमी करावेत. वारंवार होणारी वीज दरवाढ अशा प्रकारांना खतपाणी घालण्याचे काम करत आहे. ग्राहकांमध्ये जनजागृती करत दर कमी केल्यास अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.