Nashik Crime News : गोदाघाटावरील चोऱ्यांमध्ये वाढ! तेलंगणातील पर्यटकांच्या 70 हजारांसह मोबाईल, घड्याळ लंपास

Nashik News : गोदाघाटावरील चोऱ्यांमध्ये वाढ झाली असून राज्यासह परराज्यातून आलेल्या पर्यटकांसह भाविकांना गंडा घातला जात आहे.
Crime
Crime esakal
Updated on

Nashik News : गोदाघाटावरील चोऱ्यांमध्ये वाढ झाली असून राज्यासह परराज्यातून आलेल्या पर्यटकांसह भाविकांना गंडा घातला जात आहे. तेलंगणातून धार्मिक पर्यटनासाठी शहरात आलेल्या कुटुंबाचे रोख सत्तर हजार रुपये, मोबाईल, घड्याळ चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गौरी व म्हसोबा पटांगणासह रामतीर्थावरही चोऱ्यांमध्ये मोठी वाढ झाल्याने याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची गरज पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. (Crime Increase in thieves at Goda Ghat)

गोदावरीचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने रोज राज्यासह परराज्यातून पर्यटक, भाविक हजारोंच्या संख्येने येथे येतात. या पर्यटकांमधील ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, ते निरनिराळे हॉटेल्स, धर्मशाळा याठिकाणी मुक्काम करतात, तर काहीजण थेट गोदाघाटावरच आपल्या वाहनांजवळ मुक्काम करतात. गोदाघाटावर मुक्कामी असलेल्या अशा भाविकांना या चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे.

गुरुवारी (ता.२३) रात्री तेलंगणातून आलेल्या भाविकांचे कुटुंब मध्यरात्री गाढ झोपेत असताना गाडीत ठेवलेले रोख सत्तर हजार रुपये व अन्य चीजवस्तू चोरट्यांनी लांबविल्या. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर या लोकांनी पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदविली. रामतीर्थावरही सकाळच्या सुमारास दशक्रिया विधीसाठी मोठी गर्दी उसळते. (latest marathi news)

Crime
Nashik Agriculture News : यंदा सव्वासहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी; खरीप हंगाम आढावा बैठकीत खते, बियाण्यांचे नियोजन

विशेष म्हणजे समोरच पंचवटी पोलिस ठाणेअंतर्गंत पोलिस चौकी कार्यरत असूनही चोऱ्या सुरूच आहेत. यात मोबाईलसह रोख रक्कम, दुचाकी चोरट्यांकडून लक्ष्य होत आहे. गोदाघाटावर वेगवेगळ्या संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर अन्नदान सुरू असते. पोटाचा प्रश्‍न सहज सुटत असल्याने काहीजण दारू व अन्य व्यसनांसाठी चोऱ्या करत असल्याचे काही पुरोहितांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

गोदाघाटावर धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची वाहने गौरी व म्हसोबा पटांगणावर उभी केली जातात. यातील अनेकजण वाहने उभी करून त्याजवळच पथारी पसरतात. रात्री गाढ झोपेत असताना चोरट्यांकडून गाडीतील पैशांसह अन्य चीजवस्तू गायब केल्या जातात. गौरी पटांगणावर नरसिंग गोपालदास महाराज समाधी मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास चोऱ्यांना पायबंद बसू शकेल, असे अनेक व्यावसायिकांनी ‘सकाळ’ ला सांगितले.

Crime
Nashik ZP News : परस्पर सुट्टी घेणाऱ्या उपशिक्षणाधिकाऱ्यास नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.