Nashik Bribe Crime: नववर्षातही लाचखोर आघाडीवर! दीड महिन्यात 24 लाचखोर गजाआड; पुणे परिक्षेत्र अव्वलस्थानी

Bribe Crime : गेल्या वर्षी लाचखोरीच्या जाळ्यात ‘बडे मासे’ अडकल्याने राज्यभरात ‘दबंग’ कामगिरीने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चर्चा होती.
Bribe Crime
Bribe Crimeesakal
Updated on

नाशिक : गेल्या वर्षी लाचखोरीच्या जाळ्यात ‘बडे मासे’ अडकल्याने राज्यभरात ‘दबंग’ कामगिरीने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चर्चा होती. मात्र नववर्षात अद्याप मोठी कारवाई नसली तरी लाचखोरांना लागलेली ‘लाचे’ची लालूच अद्याप संपलेली नाही, असे गेल्या दीड महिन्यातील लाचखोरांविरोधातील कारवाईतून स्पष्ट होत आहे.

नाशिकच्या पथकाने दीड महिन्यात १८ लाचखोरीच्या १८ गुन्ह्यांमध्ये २४ लाचखोरांना जेरबंद केले असून, सुमारे १४ लाखांची लाचेची रक्कम जप्त केली आहे. दरम्यान, नवीन वर्षात लाचखोरीमध्ये पुणे परिक्षेत्र आघाडीवर आहे. गतवर्षी नाशिक परिक्षेत्र आघाडीवर होते. (Nashik Crime increased new year 24 bribery cases in one half months Pune Parikshetra tops marathi news)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने लाचखोरीविरोधात कारवाई होत असते. असे असले तरीही लाचखोरांकडून विविध मार्गातून लाच घेण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने सामाजिक जनजागृती केली जात असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. परिणामी लाचखोरांवर कारवाईचे प्रमाणही वाढले आहे.

२०२३ मध्ये नाशिक विभागात १६० सापळे रचून २७४ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. यंदाच्या २०२४ मध्ये जानेवारीत ५३ सापळ्यांत ७७ संशयित २०२३ च्या जानेवारीत ५९ सापळ्यांत ८१ संशयित होते. यंदा २२ फेब्रुवारीपर्यंत कारवाईनुसार, ४५ सापळ्यांत ६७ संशयित, २०२३ मध्ये फेब्रुवारीत ५८ सापळ्यांत ८७ संशयित लाचखोरीत अडकले होते.

‘गिफ्ट’चा फंडा

लाचखोरांकडून आता थेट लाचेची मागणी केली जात नाही. केलेल्या कामाचा मोबदला म्हणून गिफ्ट मागणीचा फंडा सुरू केला आहे. मुळात गिफ्टची मागणी करणेही लाचेचाच प्रकार आहे. गेल्या काही प्रकरणांमध्ये लाचखोरांनी केलेल्या कामासाठी गिफ्ट स्वरूपात लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

लाचखोरीचे ‘ब्लॅक स्पॉट’

पोलिस, लेखा-कोशागार, शिक्षण, महावितरण, महसूल आदिवासी विकास, वजन व मापे, भूमिअभिलेख, सहकार, जिल्हा परिषद हे विभाग लाचखोरीत आघाडीवरच आहेत.

नंदुरबारमध्ये संशयित ग्रामसेवक मनोज पावरा आणि खासगी व्यक्ती लालसिंग वसावे यांना रोजगार हमी योजनेच्या कामांचे मोजमाप करून देयके देण्यासाठी सहा लाख ४७ हजारांची लाच घेताना अटक झाली, तर नाशिकच्या सहकार विभागातील संशयित सहकार अधिकारी भीमराव जाधव, वरिष्ठ लिपिक अनिल घरडे यांनी तक्रारीचा निकाल सोसायटीच्या बाजूने देण्यासाठी पाच लाखांच्या लाचप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Bribe Crime
Jalgaon Bribe News : ऑपरेटर लाचेच्या जाळ्यात; ग्रामसेवक पसार

नाशिक परिक्षेत्रातील गुन्हे (२२ फेब्रुवारीपर्यंत)

जिल्हा २०२४ २०२३

नाशिक ८ ९

अहमदनगर १ ६

नंदुरबार २ २

जळगाव ४ ५

धुळे ३ ३

एकूण १८ २५

राज्यातील परिक्षेत्रनिहाय गुन्ह्यांची आकडेवारी

परिक्षेत्र.......२०२४..........२०२३

- मुंबई........६.......११

- ठाणे........१३......१९

- पुणे.........२०.......२७

- नाशिक.....१८.......२४

- नागपूर..... १२........१४

- अमरावती.....६.......७

- छत्रपती संभाजीनगर....१८.........३६

- नांदेड.......५...........६

एकूण........९८..........१४४

"लाचखोरी रोखण्यासाठी विभागाकडून जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. कोणत्याही कामासाठी बक्षिसी स्वरूपात गिफ्ट मागत असेल, तर तीही एक प्रकारची लाचच आहे. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा."

- शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र

Bribe Crime
Nashik Bribe Crime : लाचखोर कंत्राटी वीज तंत्रज्ञान कर्मचाऱ्यास अटक; लाचलुचपतच्या पथकाची येवल्यात कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.