Nashik Crime News : पाचशे रुपयांऐवजी पाच हजारांची केली ‘आरडी’! डाक सहायकाचा प्रताप; पोस्टाचे लाटले RDचे 9 लाख

Nashik News : डाक सहायकानेच स्वत:सह पत्नीच्या आरडीच्या रकमेत फेरफार करून तब्बल ९ लाख ३६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Money Fraud Crime
Money Fraud Crimeesakal
Updated on

Nashik Crime News : सिडको कॉलनीतील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या डाक सहायकानेच स्वत:सह पत्नीच्या आरडीच्या रकमेत फेरफार करून तब्बल ९ लाख ३६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात संशयित डाक सहायकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime by Postal Assistant fraud of 9 Lakhs of RD marathi)

सचिन विठोबा बोरकर असे संशयित डाक सहायकाचे नाव आहे. नाशिक उपविभागाचे सहायक डाक अधीक्षक गोपाल सुरेश पाटील (रा. काळेनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, सचिन बोरकर हा २९ मार्च २०१६ ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत सिडको कॉलनी आणि अंबड विभागाच्या पेास्ट खात्याच्या कार्यालयात डाक सहायक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी पोस्टातील विविध कामकाज हे ऑफलाईन स्वरुपाचे होते. त्याचवेळी ते ऑनलाईन करण्यासंदर्भातील काम सुरू करण्यात आले होते. ते काम संशयित बोरकर करीत होता.

संशयित बोरकर याने स्वत:च्या नावे व पत्नीच्या नावे ५०० रुपये दरमहा आरडी सुरू केली होती. त्यावेळी त्याने ऑफलाइन कामकाजाच्या नोंदी ऑनलाईन रजिस्ट्रर्ड करतांना ५०० रुपयांची नोंद ५ हजार रुपये केली. अशी चुकीची नोंद करून संशयित बोरकर याने भारतीय डाक विभागाची ९ लाख ३६ हजार ७८० रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली. (latest marathi news)

Money Fraud Crime
Nashik Crime News : उपनगर हद्दीतून दरोडेखोरांची टोळी जेरबंद; वॉचमनला धमकावून केली जबरी चोरी

दरम्यान, वरिष्ठ डाक कार्यालयात हिशाेबाचा ताळमेळ सुरू असतांना बोरकरने याने केलेला कारनामा उघडकीस आला आहे. ऑफलाईन एन्ट्री, कामकाजातील रकमा व ऑनलाईन भरलेल्या नोंदीतील तफावत आढळल्याने अखेर पाटील यांनी अंबड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नितीन फुलपगारे करीत आहेत.

Money Fraud Crime
Nashik Crime News : सामनगावातून सराईत गुंडाला अटक; चार महिन्यांपासून होता पसार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.