नामपूर : गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आलेला दोन लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा जायखेडा पोलिसांनी शुक्रवारी (ता. १९) सात वाजेच्या सुमारास साल्हेर-डांगसौंदाणे रस्त्यालगत जप्त केला असून, याप्रकरणी पोलिसांनी ९ लाख ३२ हजारांच्या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (Nashik Crime News)
बागलाण तालुक्याला लागून गुजरात राज्याची सरहद्द असल्याने मोठ्या प्रमाणात गुटखा माफिया गुजरातमधून गुटखा खरेदी करून अवैधरित्या तालुक्यासह कसमादे पट्ट्यात विक्री करतात. यापूर्वी पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही गुटखा विक्रीचे रॅकेट काही कमी होताना दिसत नाही. गुटख्याची चोरटी वाहतूक करीत असल्याची गुप्त बातमी जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा लावून महिंद्रा एक्स यूव्ही कार (क्र. एमएच ०१ बीबी एजी ९०९६) कंपनीची संशयित कार थांबवून तपासणी केली असता सदर वाहनात प्रतिबंधित असलेला विमल कंपनीचा पानमसाला, तंबाखू, सुगंधी सुपारी गुटखा भरलेली सुमारे २ लाख ३२ हजार रुपये किमतीची पोती दिसून आली. (latest marathi news)
या प्रकरणी जब्बार चांद तांबोळी, (वय ४८) रा. पिंपळगाव वाखारी (ता. देवळा), सईद पठाण, वघई, (गुजरात) यांच्या विरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनचालक तांबोळी यास यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आलेला ९ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, पोलीस शिपाई पृथ्वीराज बारगळ यांनी फिर्याद दिली.
ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार जायखेडा पोलिसांनी कारवाई केली आहे. नाशिक ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मालेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.