Nashik Crime News : अवघ्या 15 मिनिटांत दोघींच्या सोन्याच्या पोती खेचल्या; मखमलाबाद रोडवरील घटना

Crime News : या लिंकरोडवर सातत्याने सोनसाखळी चोरट्यांकडून पादचारी महिलांना लक्ष्य केले जात असून, पोलिसांकडून मात्र या चोरट्यांविरोधात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
chain snatching
chain snatchingesakal
Updated on

Nashik Crime News : म्हसरुळ-मखमलाबाद लिंकरोडवर सोमवारी (ता. १५) रात्री अवघ्या १५ मिनिटांमध्ये दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या लिंकरोडवर सातत्याने सोनसाखळी चोरट्यांकडून पादचारी महिलांना लक्ष्य केले जात असून, पोलिसांकडून मात्र या चोरट्यांविरोधात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. (Nashik Crime just 15 minutes gold chains of both pulled)

सुवर्णा प्रमोद कुर्हे (रा. रामकृष्णनगर, मखमलाबाद रोड) या सोमवारी (ता. १५) रात्री आठ वाजेच्या सुमारास घरातून पूजेसाठी मंदिराकडे पायी जात होत्या. श्रेया रेसीडेन्सीसमोर असतानाच पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील १५ हजारांची सोन्याची पोत खेचून नेली.

त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांनीच हर्षला नेमाडे (रा. पिंगळे कॉलनी) या मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत आल्या असता, घरासमोरच पाठीमागील त्याच काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची पोत खेचून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाकल करण्यात आला आहे. (latest marathi news)

chain snatching
Nashik Crime: साडेसहा महिन्यांत अवघ्या 32 'ड्र्क अँड ड्राइव्ह'ची कारवाई! मद्यपी वाहन चालकांकडून सव्वातीन लाखांचा दंड वसूल

दरम्यान, या म्हसरुळ-मखमलाबाद रोडवर सातत्याने सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटना घडत आहे. एकाच ठिकाणी होत असलेल्या घटना रोखण्यासाठी मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.

chain snatching
Jalgaon Crime News : अभियंता पाटलांच्या नावाने कंत्राटदारास दिली धमकी! शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.