Nashik Crime : शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने गेल्या साडेसहा महिन्यांमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या 32 केसेस केल्या असून यातून तीन लाख वीस हजारांचा दंड वसूल केला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून ड्रंक अँड ड्राईव्ह करीत अपघातांची मालिका सुरू असताना आणि शहरातील वाईन शॉपसमोर आणि बिअरबारमध्ये मदयपींची लक्षनीय गर्दी असताना वाहतूक शाखेला साडेसहा महिन्यांमध्ये अवघ्या 32 मद्यपी वाहनचालकच कसे गवसले, याचे आश्चर्य व्यक्त होते आहे. (Nashik Crime Just 32 drunk drive operations in six half months)
पुण्यातील पोर्शे कारच्या अपघातानंतर राज्यभरातील अपघातांची संवेदनशीलता वाढली आहे. नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये भरधाव वेगातील मद्यपी चालकांच्या वाहनाच्या धडकेने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या संदर्भात पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असले तरी रस्त्यावरती मात्र ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करन्यात पोलीस यंत्रणा उदासीनच दिसून येते.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या जानेवारीपासून ते 14 जुलै या साडेसहा महिन्यांदरम्यान शहर वाहतूक शाखेच्या विभागाने ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या अवघ्या 32 केसेस केल्या आहेत. या कारवाईतून शहर वाहतूक शाखेने तीन लाख वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. (latest marathi news)
परंतु एकीकडे वाईन शॉपीसमोरील गर्दी आणि रात्रीच्या वेळी बियर बारमध्ये मदयपिनची ओसंडून वाहणारी संख्या पाहता गेल्या सहा महिन्यात मद्यपान करून फक्त 32 वाहन चालकांविरोधातच ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस कशा, असा प्रश्न जागरूक नागरिकांना पडला आहे.
गेल्या महिन्याभराच्या काळात गंगापूर हद्दीत ड्रंक अँड ड्राईव्ह करीत अपघात केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. यात एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या घटना आयुक्तालयात हद्दीत सातत्याने घडत असताना ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यात मात्र पोलिसांची उदासीनता का, असा प्रश्न मात्र सर्वसामान्य पडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.