Nashik Crime News : गुजरातमधून मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या आवळल्या; चांदवड एक्सईज वाहन अपघात प्रकरणी तिसरी अटक!

Nashik News : मद्य तस्करांच्या वाहनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला दिलेल्या धडकेत जवान ठार झाला होता या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime News esakal
Updated on

Nashik News : लासलगाव चांदवड रस्त्यावर मद्य तस्करांच्या वाहनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला दिलेल्या धडकेत जवान ठार झाला होता या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. या प्रकरणात ही तिसरी अटक असून यापूर्वी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Nashik Crime News)

राहुल ज्योती सहाणी (४४, रा. नारोली रोड, सिल्वासा, गुजरात) असे अटकेतील मुख्य संशयित व मुख्य डिलरचे नाव असून ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने (ता १२) सापळा रचून छापा टाकला. ताे घरात असताना त्याला पाेलिसांची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने मागील दाराने साडीच्या सहाय्याने खाली उतरुन शेतात पळ काढला.

मात्र, पाेलिसांनी पाठलाग करत त्याला शेतातून अटक केली. राहुल हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर गुजरात राज्यात सोलगड, पार्डी, वलसाड, नवसारी, वलोड, नानापोडा याठिकाणी प्रोहिबिशनचे सात गुन्हे दाखल आहेत.

सहायक अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या सुचनांनुसार ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील उपनिरीक्षक खाडे, हवालदार दिपक गुंजाळ, शांताराम घुगे, पोलीस नाईक प्रकाश कासार, रमेश चव्हाण, देवा गोविंद, नरेंद्र कोळी, तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, भाउसाहेब टिळे यांनी ही कामगिरी केली. (latest marathi news)

Nashik Crime News
Latest Crime News : द्वारका भागातून जुगाऱ्यांना अटक

सहानी मुख्य डीलर

पोलीस अधीक्षक देशमाने यांनी या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराला शाेधण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण व इतर माहिती काढून मेन डिलरचा शाेध सुरु झाला. ताे सिल्व्हासा येथील घरी असल्याची माहिती कळाली.

त्यानुसार पथकाने (ता. १२) सापळा रचला. पाेलीस आल्याचे समजताच तो घरातील एसीच्या डेकमधून पाठीमागील बाजूस साडी बांधुन खाली उतरला. यानंतर घरामागील जंगलामध्ये पळून गेला. तेव्हा अंमलदारांनी जंगलातील चिखलामध्ये पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

Nashik Crime News
Thane Crime: ठाण्यातील धक्कादायक घटना ! जुन्या वादातून महिलेची हत्या, लोखंडी पाईपने केला होता हल्ला

सोमवारी झाला होता अपघात

सोमवारी पहाटे अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्याया तस्करांच्या क्रेटा कारचालकाने पाठलाग करणाऱ्या पाेलिसांसह उत्पादन शुल्क विभागाच्या सरकारी वाहनास जाणीवपूर्वक धडक देत अपघात घडविला. त्यात स्काॅर्पिओ उलटून उत्पादन शुल्क विभागाचे चालक-जवान कैलास कसबे ठार झाले हाेते, तर अन्य तिघे जखमी झाले हाेते.

या प्रकरणी क्रेटा कार चालक देवीश कांतीलाल पटेल (३७, रा. चिंचवाडा, ता. जि. वलसाड), अश्पाक अली मोहम्मद शेख ( २२, रा. युनिक अपार्टमेंट, दर्गारोड, नवसारी, गुजरात)यालाही अटक करुन तस्करीसाठी वापरलेली क्रेटा ही दमन येथून हस्तगत केली.

Nashik Crime News
Nagpur Crime : पतीपासून मूल होत नसल्याने केले बाळाचे अपहरण...महिला अडकली पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.