Nashik Crime: अजंग येथील बालिकेच्या मृत्युप्रकरणी अपहरण, खूनाचा गुन्हा; 5 तासानंतर ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन मागे

Crime News : दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी अजंग येथे स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
Ajang-Vadel villagers staged a protest on the Malegaon-Nampur road to arrest the culprits and take strict action in the case of the murder and kidnapping of bhavika
Ajang-Vadel villagers staged a protest on the Malegaon-Nampur road to arrest the culprits and take strict action in the case of the murder and kidnapping of bhavikaesakal
Updated on

मालेगाव / वडेल : अजंग (ता. मालेगाव) येथील भाविका ज्ञानेश्‍वर महाले (वय ८) या बालिकेचा संशयास्पद मृत्यु प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना त्वरीत अटक करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी अजंग येथे स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

अजंग-वडेल ग्रामस्थांनी सलग दुसऱ्या दिवशी गुुरुवारी (ता. १६) मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करत दोषींना अटक होत नाही तोपर्यंत बालिकेचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती व सहकाऱ्यांनी सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावू. संशयितांना गजाआड करु असे आश्‍वासन दिल्यानंतर तब्बल पाच तासानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. (Nashik Crime Kidnapping murder case in Ajang girl death case)

सायंकाळी सातच्या सुमारास शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात भाविकावर अजंग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी आज सकाळी शेकडो स्त्री-पुरुषांनी मालेगाव-नामपूर रस्त्यावर तंबू ठोकून रास्तारोको आंदोलनाला सुरुवात केली.

आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. रस्त्यावर ठिय्या मांडण्यासाठी मॅट टाकण्यात आले होते. काटेरी झुडूपे व विटा टाकून तसेच दुचाकी आडव्या लावत ग्रामस्थांनी रस्ता बंद केला होता. गावातील काही संतप्त तरुणांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. यामुळे महामार्गावरील आंदोलनाचा प्रयत्न फसला. अजंग येथे झालेल्या रास्तारोको आंदोलनात ग्रामस्थ संतप्त झाले होते. कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा, कुठल्याही राजकीय पक्षाचा बुथ लावू न देण्याचा इशारा देण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाेलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. बंदमुळे गावात व एरवी गजबजलेल्या अजंग बस थांब्यावर शुकशुकाट होता.

आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी संवाद साधण्यास सुरुवात केली. भाविकाची पाच तज्ज्ञ डॉक्टरांनी धुळे जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवचिकित्सा केली आहे. तिच्याशी कुठलाही गैरप्रकार अथवा अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. अपहरण खुनाची दुर्घटना दुर्दैवी आहे.

या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करु. एका संशयिताला अटक केली आहे. या गुन्ह्याचा सात दिवसात छडा लावू असे आश्‍वासन श्री. भारती यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन समाप्त होताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी भाविकाचा मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. (latest marathi news)

Ajang-Vadel villagers staged a protest on the Malegaon-Nampur road to arrest the culprits and take strict action in the case of the murder and kidnapping of bhavika
Nashik Bribe Crime : लाचखोर गर्गेची उचलबांगडी; अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी

* अजंग-वडेल ग्रामस्थांचा दुसऱ्या दिवशी नामपूर रस्त्यावर रास्ता रोको

* डाबली ग्रामस्थांकडून निषेध

* मयत बालिकेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांकडून नकार

* अजंग वडेलमध्ये झळकले निषेधाचे फलक

* पाच तासांच्या रास्तारोकोमुळे मालेगाव-नामपूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प

* वाहतूक सावतावाडी व बी सेक्शनमार्गे वळवली.

अजंग प्रशांत नगरमधील भाविका सोमवारी (ता. १३) मध्यरात्री दीडच्या सुमारास बेपत्ता झाली. प्रत्यक्षात तिचे अपहरण झाले होते. अपहरण करुन तिचा खून करण्यात आल्याचा संशय आहे. बुधवारी (ता. १५) सकाळी मोसम नदी पात्राजवळील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.

वडनेर खाकुर्डी पोलिसांनी या गुन्ह्यात योगेश पटाईत (३२, रा. अजंग) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात अन्य आणखी काही संशयित असण्याची शक्यता आहे. योगेशचे घर भाविकाच्या आजीच्या घरानजीकच आहे. संतप्त ग्रामस्थांनी पटाईतचे घर पेटवून देत संसारोपयोगी साहित्याची नासधूस केली.

दरम्यान पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई करु. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. ग्रामस्थांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी केले.

Ajang-Vadel villagers staged a protest on the Malegaon-Nampur road to arrest the culprits and take strict action in the case of the murder and kidnapping of bhavika
Beed Crime News : जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात तीस लाखांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.