Nashik Crime News : लक्ष्मी ताठे यांनातेलंगण पोलिसांकडून अटक!

Nashik News : धामेरा (जि. वारंगल, तेलंगण) या ठिकाणी अमलीपदार्थ प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये पंचवटीतून लक्ष्मी ताठे यांना तेलंगण पोलिसांनी बुधवारी (ता. १०) सायंकाळी अटक करून नेले आहे.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik News : धामेरा (जि. वारंगल, तेलंगण) या ठिकाणी अमलीपदार्थ प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये पंचवटीतून लक्ष्मी ताठे यांना तेलंगण पोलिसांनी बुधवारी (ता. १०) सायंकाळी अटक करून नेले आहे. ताठे यांची गेल्या वर्षी शिंदे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, धामेरा (तेलंगण) येथील पोलिसात अमलीपदार्थ संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. (Lakshmi Tathe arrested by Telangana Police)

त्यात अटक करण्यात आलेल्या संशयितांना ताठे हिच्याशी संबंध असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सदर कारवाई ८ जूनला झालेली होती. तेलंगण पोलिसांनी नगर व पुण्यातून काही संशयितांना अटक केली असता, त्यांच्या चौकशीतून लक्ष्मी ताठे यांचाही त्यांच्याशी संबंध असल्याचे तपासात समोर आले.

त्यामुळे तेलंगण पोलिसांनी बुधवारी (ता. १०) नाशिकमध्ये दाखल होत पंचवटी पोलिसांच्या मदतीने लक्ष्मी ताठे यांना अटक केली आहे. सायंकाळी सुमारास तेलंगण पोलिस ताठे यांना घेऊन तेलंगणाकडे रवाना झाले आहेत. (latest marathi news)

Nashik Crime News
Crime News : सोने विकायला आले अन् जाळ्यात अडकले; घरफोडी करणारी टोळी गजाआड

जून २०१८ मध्ये नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तपोवनातील ६९० किलो गांजासह आयशर ट्रक पकडला होता. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार लक्ष्मी ताठे यांनाही अटक केली होती.

शहरातील गांजाच्या तस्करीमध्ये ताठे नाव अग्रस्थानी असल्याचे बोलले जाते. दरम्यान ताठे या शिवसेनेच्या शिंदे गटाची पदाधिकारी होती, परंतु गेल्या वर्षी विश्रामगृहावरील बैठकीत वाद झाल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Nashik Crime News
Akola Crime : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंतासह दोघांनी थकीत पगार काढण्याकरिता महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.