Nashik Crime News : बिबट्याची कातडी विकणारी टोळी गजाआड; 5 संशयितांना अटक

Nashik Crime : बिबट्याची शिकार करून त्याची कातडी काढली आणि ती कातडी एका भोंदू बाबाला विक्री करण्यासाठी आलेल्या पाच संशयितांना स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
A group that hunts leopards and sells their skins. Along with Additional Superintendent Aditya Mirkhelkar and the local crime branch team.
A group that hunts leopards and sells their skins. Along with Additional Superintendent Aditya Mirkhelkar and the local crime branch team.esakal
Updated on

नाशिक : मोराच्या डोंगराजवळ (ता. इगतपुरी) रात्रीच्या वेळी बिबट्याची शिकार करून त्याची कातडी काढली आणि ती कातडी एका भोंदू बाबाला विक्री करण्यासाठी आलेल्या पाच संशयितांना स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली कातडी बिबट्याचीच असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Leopard skin selling gang marathi news)

नामदेव दामू पिंगळे (३०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी), संतोष सोमा जाखीरे (४०, रा. मोगरा, ता. इगतपुरी), रवींद्र मंगळू आघाण (२७, रा. खैरगाव, ता. इगतपुरी), बहिरु उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी (५०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी), बाळू भगवान धोंडगे (३०, रा. धोंडगेवाडी, ता. इगतपुरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. तर भोंदू बाबा दिलीप याचा पोलीस शोध घेत आहेत.

स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना पिंपळगाव मोर गावशिवारातील मोराचे डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित वन्यप्राण्याची कातडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने बुधवारी (ता. १३) पहाटेपासून या परिसरात सापळा रचला होता. संशयित आल्याची खात्री पटताच दबा धरून असलेल्या पथकाने पाचही संशयितांना जेरबंद केले.

त्यांच्याकडील गोणपाटाची तपासणी केली असता, त्यात बिबट्याची कातडी व कोयता आढळून आला. सदरील कातडीची जिल्हा पशूवैद्यकीय चिकित्सालयात तपासणी केली असता, ती कातडी बिबट्याचीच असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वनरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत. (latest marathi news)

A group that hunts leopards and sells their skins. Along with Additional Superintendent Aditya Mirkhelkar and the local crime branch team.
Nashik Crime News : मातोरीच्या गुंडाला तडीपार

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक नाना शिरोळे, संदीप नागपुरे, चेतन संवस्तरकर, मेघराज जाधव, हेमंत गरुड, विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांनी बजावली.

बिबट्याची केली शिकार

संशयित संतोष जाखीरे याची भोंदूबाबा दिलीप बाबा याच्याशी ओळख होती. या भोंदू बाबाने वाघाची कातडीची मागणी केली होती. त्यानुसार जाखीरे याचा मित्र संशयित नामू पिंगळे हा गुराखी असून तो मोराचे डोंगरावर गुरे चारण्यासाठी जात असतो. त्यामुळे त्यास या परिसरामध्ये वन्यप्राणी असल्याची माहिती होती.

मोराचे डोंगराजवळ असलेल्या डोहाजवळ वन्यप्राणी येत असल्याने, त्याने त्याठिकाणी दुचाकीच्या क्लचवायरचा वापर करून फास लावला. रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेला बिबट्या या फासात अडकला. संशयिताने त्या ठार मारून त्याची कातडी काढली. ती उन्हात वाळवली आणि संशयित दिलीप बाबाला ते विकणार होते.

A group that hunts leopards and sells their skins. Along with Additional Superintendent Aditya Mirkhelkar and the local crime branch team.
Nashik Crime News : पत्नीचे अनैतिक संबंध अन पती गेला जीवानिशी; दोघांच्या बेदम मारहाणीत अमोलचा मृत्यु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.