Nashik Crime News : निवडणुकीच्या काळात पावणेदोन लाखांचा मद्यसाठा जप्त! राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Nashik News : नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी ८१ हजार ८०६ लिटर मद्यसाठा जप्त केला. गेल्या लोकसभेच्या तुलनेत कारवाईत ७० टक्के वाढ झाली आहे.
Liquor stock of two lakh seized
Liquor stock of two lakh seizedesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाला तब्बल पावणेदोन कोटींचा अवैद्य मद्यसाठा सापडला आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी ८१ हजार ८०६ लिटर मद्यसाठा जप्त केला. गेल्या लोकसभेच्या तुलनेत कारवाईत ७० टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक मद्यसाठा इगतपुरी, त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात जप्त करण्यात आला आहे. तर सर्वांत कमी मद्यसाठा मालेगाव मध्य मतदारसंघात जप्त करण्यात आला आहे. ( Liquor stock of two lakh seized)

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात विविध ठिकाणी मोहीम राबवली. गुप्त माहितीच्या आधारे आतापर्यंत ५८० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात प्रथमच कारवाई होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा कार्यक्षेत्रात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत.

यात नाशिक, दिंडोरी व धुळे जिल्ह्यातील बागलाण आणि मालेगाव मध्य, बाह्य असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान व निकाल पूर्ण होईपर्यंत ७६ हजार लिटर मद्य जप्त करण्यात आले होते. मागील लोकसभेदरम्यान झालेल्या कारवाईची तुलना केली असता, जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किमतीमध्ये ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. (latest marathi News)

Liquor stock of two lakh seized
Amravati Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आईचा आरोप , कथित बाबा आश्रमातून पसार

कारवाईचे वैशिष्ट्ये

- नाशिक मतदारसंघात ६३ हजार १२७.६७ लिटरचा एक कोटी पाच लाख ७७ हजार ५०३ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

- दिंडोरी मतदारसंघात १२ हजार ९०८.७२ लिटरचा ७४ लाख ४७ हजार ३२४ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

- धुळे मतदारसंघात पाच हजार ७६९.७० लिटरचा आठ लाख पाच हजार ४७० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

"अनेक ठिकाणी गस्त व गुप्त माहितीच्या आधारे सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. यामध्ये आतापर्यंत अवैद्य मद्यसाठा जप्त करण्यात विभागाला यश मिळाले. यापुढील कालावधीतही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहील." - शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक

Liquor stock of two lakh seized
Chandrapur Crime : चोरट्यांनी फोडले न्यायाधीशांचे घर;सोने, चांदीचे दागिने, रोख रकम केली लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.